“अफजलखानाची कबर फोडून दाखवली”; शिवसेनेनं मातोश्रीसमोर पोस्टरबाजी करून एकनाथ शिंदे यांचा गवगवा केला

| Updated on: Feb 25, 2023 | 7:10 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामाकरण करण्यात आले आहे. याबाबतची पोस्टरबाजी करून उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

अफजलखानाची कबर फोडून दाखवली; शिवसेनेनं मातोश्रीसमोर पोस्टरबाजी करून एकनाथ शिंदे यांचा गवगवा केला
Follow us on

मुंबईः गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नामांतर करण्याची मागणी हिंदुत्ववादी राजकीय पक्षाने केली होती. त्यानंतर आता या औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद या शहराचे धाराशिव नामाकरण करण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यातच आता शिवसेनेच्या नेत्यांनी नामांतरावरून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करत मातोश्रीसमोरच आता पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नामांतरावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे राजकारण पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे राजकारण आता प्रचंड तापले आहे. त्यातच औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामकरण करण्यात आल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामाकरण करण्यात आले आहे. याबाबतची पोस्टरबाजी करून उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

मातोश्रीसमोर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नामांतराची पोस्टरबाजी करत करून दाखवल्याचे सांगण्यात आले आहे.

अफजलखानाची कबर फोडून दाखवली, प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करून दाखवला, गडकिल्यांसाठी महामंडळ स्थापन करून दाखवलं अशी पोस्टर बाजी करून एकनाथ शिंदे यांनी कोणकोणते निर्णय घेतले आणि ते घेऊन दाखवले याचा टोला उद्धव ठाकरे यांना लगावण्यात आला आहे.

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामाकरण करून हिंदुत्वावादाचं सरकार असल्याचे दाखवून दिले आहे असे मत आता शिंदे गटातील नेत्यांकडून सांगण्यता आले आहे.

त्यामुळे नामाकरणाचा झालेला निर्णय हा एकनाथ शिंदे यांनी कसा घेतला आणि तो कसा अमंलामध्ये आणला आहे असंही आता सांगण्यात येत आहे.