मुंबई : एनसीबीचे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail Death) यांच्या अचानक मृत्युने सध्या खळबळ माजली आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Cordelia cruise drug case) अत्यंत महत्वाचा असा तो साक्षीदार होता. मात्र त्यांचाच आता मृत्यू झाल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. अशा वेळी त्यांच्या घरच्यांनी विशेषत त्यांच्या आईने काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आता माझा मुलगा गेला आता कसल्या चौकशा करता? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. प्रभाकर साईलचा अचानक मृत्यू होणे संशयास्पद आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती दिलीप वळसे-पाटलांनी दिली आहे. त्यावरच ही संतप्त प्रतिक्रिया आली आहे. प्रभाकर साईल यांच्याबाबत विचारले असता, त्यांची आई भावूक झाल्याचे दिसून आले. मुलाबाबात बोलताना त्या म्हणाल्या, मुलगा गेल्याचं दु:ख आहे. पण तो आमच्या संपर्कात नव्हता. आम्हाला त्याच्या मृत्युची बातमी आज कळाली, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिलीय.
काही दिवसांपूर्वीच प्रभाकर साईलने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले होते. त्यात खंडणी मागितल्याच्या आरोपचाही समावेश आहे. त्यामुळे सहाजिकच त्याच्या मृत्युनंतर पुन्हा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याबद्दल सांगताना त्यांची आई म्हणाली, प्रभाकरशी तिचं बोलणं झालं होतं, पण अचानक काय झालं ते समजण्यापलीकडचं आहे. तो एकटाच राहत होता, एक दिवसापूर्वी संवाद झाला होता, त्यावेळी तो ठिक होता. मात्र अचानक काय झाले माहीत नाही. काल त्यांची तब्येत ठीक नसल्याचा फोन आला आणि तयांचे निधन झालं. इतर चौकशीबाबतही काहीच माहीती नाही. त्याला दोन मुली आहेत, त्यांचं कसं होणार माझा मुलगा तर गेला आत्ता काय बोलायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवारी प्रभाकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज केसमध्ये सापडला आहे. त्याच केसमध्ये प्रभाकर साईल पंच असल्याने त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून त्याच नाव सतत चर्चेत होतं. आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानकडे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. आरोप झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नेहमी चर्चेत राहिलेले तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचाही समावेश होता. कुणी किती पैसे मागितले याची आकडेवारीही प्रभाकर साईलन यांनी सांगितली होती. त्यामुळे या आरोपानंतर खळबळ माजली होती.
Ajit Pawar: पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहन
Medha Patkar : पोलीस तक्रार प्राधिकरण सक्षम करा; मेधा पाटकर यांची हायकोर्टात धाव