“धर्माधिकारी, सरकारने चामडी बचाव केलं”; या नेत्याने खारघरच्या घटनेवर तोफ डागली

| Updated on: Apr 19, 2023 | 10:12 PM

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाल्यानंतर 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला, मात्र दुपारी कार्यक्रम असतानाही उपस्थित असलेल्या लोकांसाठी धर्माधिकारी यांची एवढी संपत्ती असतानाही त्यांनी छत का बांधू शकले नाहीत असा सवाल त्यांनी केला.

धर्माधिकारी, सरकारने चामडी बचाव केलं; या नेत्याने खारघरच्या घटनेवर तोफ डागली
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम नवी मुंबईच्या खारघर येथे पार पडलेला असताना यावेळी या सोहळ्याला 22 लाख श्रीसेवकांनी हजेरी लावली होती.हा कार्यक्रम झाल्यानंतर मात्र उष्माघाताच्या त्रासामुळे 13 श्रीसेवकांना आपला जीव गमावावा लागला होता. या दुर्देवी घटनेमुळे या कार्यक्रमाला गालबोट लागले होते. कार्यक्रमानंतर आणि लोकांच्या मृत्यूचा आकडा समोर आल्यानंतर मात्र काँग्रेसकडून विरोधकांनी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली, तर या कार्यक्रमाची जबाबदारी सरकार स्वीकारली पाहिजे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला होता.

आता काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तर हल्लाबोल केला आहेच, त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करत, त्यांनी लोकांसाठी मंडप का उभा केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आल्यानंतर त्या कार्यक्रमानंतर 13 श्रीसेवकांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर जोरदार खळबळ उडाली होती.

त्यावरूनच आता प्रकाश आंबेडकर यांनी धर्माधिकारी यांच्या या कार्यक्रमावर काही सवाल उपस्थित केल्याने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

प्रकाश आंबडेकर यांनी खारघर श्रीसेवक मृत्यू प्रकरणी टीका करताना म्हणाले की, एवढा मोठा कार्यक्रम होता. तर मग धर्माधिकारी यांनी त्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी छत निर्मिती का करण्यात आली नव्हती.

तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यांच्या ट्रस्टवर टीका करत ते ट्रस्ट फक्त त्यांच्या कुटुंबीयांचेच असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

त्यामुळे धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमानंतर मात्र धर्माधिकारी आणि सरकारने चामडी बचाव केलेलं असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाल्यानंतर 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला, मात्र दुपारी कार्यक्रम असतानाही उपस्थित असलेल्या लोकांसाठी धर्माधिकारी यांची एवढी संपत्ती असतानाही त्यांनी छत का बांधू शकले नाहीत असा सवाल त्यांनी केला.