“आता जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला आवरावं, नाही तर सळो की…”; भाजप नेत्याचा आव्हाडांना थेट इशारा…

| Updated on: Feb 05, 2023 | 9:59 PM

जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला आवरावे नाही तर आम्ही तुमची सळो की पळो करुन सोडू असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला आहे.

आता जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला आवरावं, नाही तर सळो की...; भाजप नेत्याचा आव्हाडांना थेट इशारा...
Follow us on

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजूनही विस्तार झाला नाही मात्र विस्तार करण्यात येईल म्हणून शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांनी कोट शिवून घेतले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांच्या निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारची काळजी करू नये. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता करावी असा टोला प्रवीण दरेकर यांनी त्यांना लगावला आहे.

त्याच बरोबर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. त्यावरही अजित पवार यानी टीका केली होती.

त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपने देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात महिलांना भाजपने जास्त संधी दिली आहे अशी माहिती देत अजित पवार फक्त राजकीय अभिनिवेशातून अशी वक्तव्य करत असतात अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळ्या प्रकारचे आलबेल चालू असून अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाची काळजी करू नये. त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची काळजी करावी असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

आमदार प्रवीण दरेक यांनी शिंदे-फडणवीस सरकारची बाजू मांडताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, औरंगजेब, अफजल खान यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चातुर्याला, त्यांच्या गनिमी काव्याला महत्व आले आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नागपूरमध्येही त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड फक्त मुस्लिम मतं मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आता जितुद्दीन करावे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला आवरावे नाही तर आम्ही तुमची सळो की पळो करुन सोडू असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला आहे.