मनोज जरांगे यांनी भोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं. पण आता त्यांच्या पोटात जी राजकीय महत्वकांक्षा होती, ती आता समोर आली आहे. यापूर्वी मुक मोर्चा झाले कुठलाही नेता त्यावेळी नव्हता. मराठा समाजाने एक विश्वास टाकला होता त्याला ठेच पोहोचवू नका. केवळ विधानसभेपुरता प्रश्न धगधगत ठेवायचा हा त्यांचा हेतू आहे. जरांगे जवळपास राजकीय झालेले आहेत. मराठा समाजाचे कवच घेऊन ते राजकीय भूमिका निभावत आहेत. बांगलादेश येथे काय मुद्दा आहे ते आधी समजून घ्या… माहिती न घेता त्याच्याशी संदर्भ जोडून वातावरन पेटवू नका, असं म्हणत भाजपच नेते प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
मराठा समाजासाठी अनेक संघटना काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते ते टिकले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर के रे पाटील यांनी मोर्चा आणने हे काही कळले नाही, असं म्हणत दरेकरांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे श्रावणात सोनिया दर्शन करायला दिल्लीला गेले असावेत. दुसऱ्यांना दिल्लीच्या पायाकडे गेले म्हणून टीका करायची. आता स्वतः मात्र खेटे स्वतः खेटे मारत आहेत. दिल्लीत ते सोनिया दर्शन घ्यायला गेले, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रविण दरेकरांनी टीका केली आहे. आपण पण आठ दिवस वाट पाहू नंतर बोलू. ते काय करतात आधी ते बघू. अडसूळ हे काही प्रमुख नेते नाही जागा वाटपाबाबत निर्णय आमचे प्रमुख नेते करतील, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी आनंदराव अडसूळ प्रकरणावर भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनीती त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. ते विभागावर बैठका घेत आहेत. आजही दोन विभागाची ते बैठक घेत आहेत, असं म्हणत दरेकरांनी भाजप बैठकीचा उद्देश सांगितला. संजय राऊत यांचा हल्ला कावळ्याचा हल्ला आहे. आम्ही त्यांना पोपट समजत होतो. पण त्यांनी आता नवीन ओळख सांगितली आहे. कावळ्याच्या चोचा मारणे येवढं त्याचे काम आहे. एक नवीन ओळख संजय राऊत यांची झालेली आहे, असं दरेकर म्हणाले.