रायगड: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)यांनी राज्य सरकारनं सुरक्षा काढल्याच्या निर्णयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. हा खरं म्हणजे सूड भावनेने घेतलेला निर्णय आहे. राजकीय नेत्यांना दिलेली सुरक्षा सविंधानानं दिलेला प्रोटोकॉल आहे. देवेंद्र फडणवीस किंवा मी सुरक्षा मागितली नव्हती. आतापर्यंत सुरक्षेच्याबाबतीत राजकीय निर्णय झाला नव्हता, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. ते रायगड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pravin Darekar slams MVA Government over security withdrawal issue)
आमची सुरक्षा काढली तरी हरकत नाही. आम्ही जनतेत फिरत राहणार, आमच्यावर दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्यावं, असंही प्रविण दरेकर म्हणाले. राज्यात सरकारच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकं दगावत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. राज्य सरकानं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असा सल्ला राज्य सरकारला दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसं सुरक्षित नाहीत, पक्षी सुरक्षित नाहीत.राज्यात पोपट मरतायत, कावळे, बगळे, पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात माणसं सुरक्षित नाहीत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. राज्य सरकारनं सुरक्षेच्या कवचातून बाहेर यावं आणि जनतेसाठी काम करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले.
धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर
महाराष्ट्र असुरक्षित झाला तरी सरकार सुरक्षित राहिला पाहिजे या कवचातून बाहेर या, असं आवाहन प्रविण दरेकर यांनी केलं आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे सरकार सत्तेत आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.नवजात बालकांपासून आबालवृद्ध महिला असुरक्षित होत्या. आता तर कावळे, बगळे पशू पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहेत बाकी सर्व असुरक्षित आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले.
VIDEO : सुरक्षा कपातीचं आम्ही स्वागतच करतो, महिलांना सध्या सुरक्षेची गरज : चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/fxjQBeJjuI
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 10, 2021
संबंधित बातम्या:
(Pravin Darekar slams MVA Government over security withdrawal issue)