शरद पवार गटाची दिल्लीतील बैठक अधिकृत नाही; प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jul 07, 2023 | 6:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०२२ मध्ये झालेल्या अधिवेशनाला अधिवेशन म्हणता येणार नाही. माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांनी ३० तारखेला पिटीशन दाखल केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शरद पवार गटाची दिल्लीतील बैठक अधिकृत नाही; प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : काल नवी दिल्ली येथे शरद पवार गटाची बैठक झाली. ही बैठक अधिकृत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे. अजित पवार हे आमचे नेते असल्याचं विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. आमच्या पक्षाात अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीत नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोपही प्रफुल्ल पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०२२ मध्ये झालेल्या अधिवेशनाला अधिवेशन म्हणता येणार नाही. माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांनी ३० तारखेला पिटीशन दाखल केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

निवडणूक आयोगाकडे केली मागणी

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिलं. पक्ष बहुमतानं अजित पवार यांच्या पाठीशी आहे. सर्व राष्ट्रवादीच्या घटनेनुसार सुरू आहे. आम्हाला पक्ष म्हणून चिन्ह मिळण्याबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.

तसं करता येत नसल्याचं पटेल यांचं म्हणणं

अधिकार माझ्याकडे आहेत. संस्थेप्रमाणे आम्हाला काम करायचे आहे. शरद पवार गटाची काल बैठक झाली, त्याचे अधिकारचं त्यांच्याकडे नाहीत. बैठकीत जे निर्णय घेतले गेले ते कुणालाही लागू होत नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून काढल्याचे कालच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. पण, तसं करता येत नसल्याचं प्रफुल पटेल म्हणाले.

आम्ही काहीही चुकीचं केलं नाही

आम्ही निवडणूक आय़ोगाच्या निकषात आम्ही बसतो. त्यामुळे आमचे निर्णय हे वैध आहेत. तांत्रिक आणि कायद्याच्या बाबतीत आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. जयंत पाटील यांना आम्हाला अपात्र करण्याचा अधिकार नाही, असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. आमच्या गटातील लोकांवर कारवाई करण्याचा त्यांना अधिकार नाही, असंही पटेल यांनी म्हंटलं.