मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या बुलडाण्यातील दोन जवानांचाही यामध्ये समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी उच्चायुक्तांना नोटीस बजावली आहे. त्याचवेळी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरमधील पुलवामात दाखल झाले.
जगभरातून निषेध
दरम्यान या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. भारतात तर विविध ठिकाणी निषेध रॅली निघत आहेत. बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटपटू, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शहिदांना आदरांजली वाहिली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकिस्तानवर शरसंधान साधलं. गंभीरने ट्विट करुन आता टेबलवर नव्हे तर युद्धभूमीत चर्चा करा असं म्हटलं आहे.
गंभीर, सेहवागचा निशाणा
गंभीर म्हणतो, “फुटीरतावाद्यांशी चर्चा करतो, पाकिस्तानशी चर्चा करतो, मात्र आता ही बातचीत टेबलवर नको, युद्धभूमीत व्हायला हवी. आता सहनशक्ती संपली आहे”
Yes, let’s talk with the separatists. Yes, let’s talk with Pakistan. But this time conversation can’t be on the table, it has to be in a battle ground. Enough is enough. 18 CRPF personnel killed in IED blast on Srinagar-Jammu highway https://t.co/aa0t0idiHY via @economictimes
— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 14, 2019
सेहवागची प्रतिक्रिया
पुलवामा हल्ल्याप्रकरणी टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाजी वीरेंद्र सेहवागनेही दु:ख व्यक्त केलं. सेहवाग म्हणाला शोक व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. जखमी सैनिक तातडीने बरे होवोत हीच प्रार्थना, असं सेहवागने म्हटलं. सेहवाग ट्विटमध्ये म्हणतो, “जम्मू काश्मीरमध्ये आमच्या सीआरपीएफच्या वीर जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने दु:ख झालं. हे दु:ख वर्णन करण्यास शब्द नाहीत. जखमी जवान तातडीने बरे व्हावेत हीच मनोकामना”
Really pained by the cowardly attack on our CRPF in J&K in which our brave men have been martyred . No words are enough to describe the pain. I wish a speedy recovery to those injured.#SudharJaaoWarnaSudhaarDenge
— Virender Sehwag (@virendersehwag) February 14, 2019
सलमान खानची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. “माझ्या देशाच्या जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मला अतिव दु:ख होत आहे. आपलं कुटुंब सुरक्षित राहावं, त्यासाठी जवानांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावली” #YouStandForIndia”
My heart goes out for the Jawans of our beloved country and their families who lost their lives as martyrs to save our families… #YouStandForIndia
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 14, 2019
आमीर खान
अभिनेता आमीर खाननेही शहीद जवानांना सलाम केला. “पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हृदय पिळवटून टाकलं आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत”, असं आमीर खानने म्हटलं.
I am heartbroken to read about the terrorist attack on our CRPF Jawans in Pulwama. It’s so tragic. My heartfelt condolences to the families of the Jawans who have lost their lives.
— Aamir Khan (@aamir_khan) February 15, 2019
शाहरुख खान –
शाहरुख खान म्हणतो, “आमच्या बहादूर जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. देशाच्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो”
Heartfelt condolences to the families of our valiant jawans. May the souls of our countrymen who laid their lives down for us rest in peace. #Pulwama
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 15, 2019
नेमकं काय घडलं?
दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
शरद पवारांचा मोदींवर हल्ला
मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असत. मी मात्र आता राजीनाम्याची मागणी करणार नाही. पण याबाबत सरकारचे अपयश या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याचं शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
मी मोदींचा राजीनामा मागणार नाही: शरद पवार
भारताकडून पाकिस्तानचा MFN दर्जा रद्द, MFN म्हणजे नेमकं काय?
Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?
गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले
Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप