Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट, पिंपरी- चिंचवडमधील अश्विनी जगतापांच्या विजयाची 5 मुख्य कारणे

| Updated on: Mar 03, 2023 | 12:42 AM

भाजपच्या अश्विनी जगतापांनी निकालात बाजी मारली. चिंचवडच्या निकालावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट, पिंपरी- चिंचवडमधील अश्विनी जगतापांच्या विजयाची 5 मुख्य कारणे
Follow us on

मुंबई : चिंचवडच्या पोटनिवडणूक राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं गाजली. त्याची झलक निकालातही दिसली. तर भाजपच्या अश्विनी जगतापांनी निकालात बाजी मारली. चिंचवडच्या निकालावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात

कसबा भाजपनं गमावलं असलं तरी चिंचवड राखण्यात भाजपला यश आलंय..भाजपच्या अश्विनी जगतापांनी, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटेंचा पराभव केला.

भाजपच्या अश्विनी जगतापांना 1 लाख 35 हजार 494 मतं मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंना 99 हजार 424 मतं तर बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना 40 हजार 75 मतं मिळाली म्हणजे अश्विनी जगतापांना 36 हजार 70 मतांनी विजय झाला.

2019 मध्ये दिवंगत लक्ष्मण जगतापांचा 37 हजार 798 मतांनी विजय मिळवत हॅटट्रिक केली होती. आता 2024 मध्ये अश्विनी जगतापांनाही 36 हजार 70 मतं मिळालीत. अश्विनी जगतापांचा मार्ग, तिरंगी लढत झाल्यानं सुकर झाला. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळं मतांचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फटका महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटेंना बसला.

नाना काटेंना 99 हजार 424 मतं, राहुल कलाटेंना 40 हजार 758 मतं या दोघांच्या मतांची बेरीज केली तर 1 लाख 40 हजार 182 मतं होतात..म्हणजेच अश्विनी जगतापांपेक्षा 4 हजार 688 मतांनी अधिक आहे. लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं चिंचवडची पोटनिवडणूक झाली..भाजपनं त्यांच्याच पत्नीला तिकीट दिलं…अश्विनी जगतापांच्या विजयाची कारणं काय आहेत, तेही पाहुयात.

अश्विनी जगपातांना सहानुभूतीचा फायदा झाला, लक्ष्मण जगतापांचं चिंचवड मतदारसंघावर असलेल्या वर्चस्वाचा फायदा त्यांच्या पत्नीला झाला. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळं महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाली. कलाटे आधी शिवसेनेत होते, त्यामुळं त्यांना ठाकरे गटातल्या काही कार्यकर्त्यांनी मदत केल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनं कलाटेंना पाठींबा दिल्यानं राष्ट्रवादीच्या काटेंचं नुकसान झालं. भाजपचे महेश लांडगे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी जगतापांसाठी एकत्र प्रचार केला.

नाना काटेंचा पराभव हा, वैयक्तिकरित्या अजित पवारांनाही झटका आहे. कलाटेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असं वाटत होतं पण अजित पवारांनी नाना काटेंना उमेदवारी दिली. त्यानंतर प्रचारात अजित पवारांनी प्रचारात पूर्ण ताकद झोकली. इतकंच काय शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच ऑनलाईन भाषणही झालं पण नाना काटे काही विजयी होऊ शकले नाहीत.

2009पासून लक्ष्मण जगताप चिंचवड मतदारसंघातून सलग आमदार होते. आता अश्विनी जगतापांचा विजय झाल्यानं, चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीयांचा दबदबा कायम राहिलाय. कसब्यात भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. तिथं भाजपचा पराभव झाला..पण बंडखोरीमुळं चिंचवडमध्ये तिहेरी लढत झाली तिथं भाजपचा विजय झाला. म्हणजेच महाविकास आघाडीशी थेट लढतीत भाजपचं टेंशन वाढतं हे दोन्ही पोटनिवडणुकीतून स्पष्ट झालंय.