काँग्रेस खासदार राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते झालेत. म्हणजेच विरोधकांचे प्रमुख म्हणून राहुल गांधी लोकसभेचा आवाज असतील. विशेष म्हणजे 10 वर्षांनी काँग्रेस किंवा विरोधकांना विरोधी पक्षनेता पद मिळालंय. कारण 2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नव्हतं. पण आता 99 खासदार असल्यानं काँग्रेसकडून राहुल गांधी विरोधी पक्षनेते झालेत.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचं नेतृत्व एकप्रकारे राहुल गांधींनीच केलं. राहुल गांधींच्या सभा गाजल्या. संविधानाचा मुद्दा राहुल गांधींना लावून धरला. आधी पायी भारत जोडो यात्रा नंतर न्याय यात्रेनं राहुल गांधी विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचवलं. निवडणुकीत राहुल गांधीमुळं काँग्रेसचाच नाही तर इंडिया आघाडीचाही फायदा झाला आणि इंडियाचं संख्याबळ 235 पर्यंत पोहोचलं.
पाहा व्हिडीओ:-
आता राहुल गांधी ईडी, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग यांच्या संचालकांची निवड करण्याच्या समितीचे सदस्य असतील. ज्यात पंतप्रधान मोदींना राहुल गांधींची संमती घ्यावी लागेल. तसंच निवडणूक आयुक्त, लोकपाल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवडण्याच्या समितीत राहुल गांधी असतील. संसदेच्या मुख्य समित्यांमध्येही विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचा समावेश असेल.
ही दृश्यं फार बोलकी आहेत. असाच मान सन्मान यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना देताना दिसतील. नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेण्यासाठी आधी मोदी समोर आले आणि राहुल गांधी पुढे आले. मोदींनी बिर्लांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मोदींना राहुल गांधींना इशारा करत पुढे येण्यास विनंती केली. राहुल गांधींनी आधी बिर्लांसोबत शेकहँड केला आणि नंतर मोदींशीही हात मिळवला. त्यानंतर मोदी आणि राहुल गांधी बिर्लांना त्यांच्या स्थानापर्यंत नेलं..आणि तिथंही आधी मोदींनी ओम बिर्लांसोबत शेकहँड केला.आणि नंतर पुन्हा मोदींना राहुल गांधींना पुढे येण्याचा इशारा केला.
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDAकडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी अर्ज दाखल केले होते. लोकसभेचे उपाध्यक्षपदाची मागणी भाजपनं नाकारल्यानं काँग्रेसनं के सुरेश यांना उमेदवारी दिली .पण ऐनवेळी विरोधकांनी मतविभाजन अर्थात मतदानाची मागणी न केल्यानं, हंगामी अध्यक्षांनी आवाजी मतदानानं बिर्लांची निवड झाली. गांधी घराण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते होणारे राहुल गांधी तिसरे विरोधी पक्षनेते असतील. याआधी राजीव गांधी 18 डिसेंबर 1989 ते 24 डिसेंबर 1990 याकाळात विरोधी पक्षनेते होते .तर सोनिया गांधी 1999 ते 2004 पर्यंत वाजपेयींचं सरकार असताना विरोधी पक्षनेत्या होत्या. आता मोदींसमोर पुन्हा राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून असतील. म्हणजेच विरोधकांचा आवाज आणखी मजबूत होईल.