राहुल नार्वेकर आजारी पडले ही राजकीय भूकंपाची सुरुवात?; कुणी केला दावा

| Updated on: Jan 07, 2024 | 2:04 PM

Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. धुळे दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी त्यावर टोला हाणला. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण मत व्यक्त केले.

राहुल नार्वेकर आजारी पडले ही राजकीय भूकंपाची सुरुवात?; कुणी केला दावा
Follow us on

मुंबई | 7 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावर राजकीय चिमटे काढायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पण याप्रकरणात टोला हाणला. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा राजकीय भूंकप असल्याचा टोला त्यांनी हाणला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला आहे. तर नार्वेकर आजारी आहेत, ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा समाचार राऊत यांनी घेतला.

बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार

जानेवारी महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर खासदार राऊत यांनी हा पलटवार केला. राहुल नार्वेकर आजारी पडले, ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा टोला त्यांनी हाणला. राहुल नार्वेकर यांच्या आजारपणानिमित्ताने पुन्हा वार प्रतिवार सुरु झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

31 जानेवारीपर्यंत डेडलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाने एकमेकांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु होणार होती. पण नार्वेकर यांची तब्येत बिघडल्याने सुनावणी रद्द झाली. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात अपात्रता याचिकांवरील कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यापूर्वी या याचिकांवर निकाल होणे अपेक्षित आहे.

मंत्रालयात शुकशूकाट

शासन आपल्या दारीवर राज्य सरकार खर्च करत आहे. एक कोटी रुपये एका कार्यक्रमाला लावतात कशाला एवढा खर्च करतात. आज आपले मुख्यमंत्री कार्यक्रम घेऊन जातीचे दाखले वाटत आहेत हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. मंत्रालयात कधीही जा शुकशुकाट असतो. मंत्री कुठे जातात तेच कळत नाही. मंत्रालयात कोणी दिसत नाही, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.