महत्त्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

| Updated on: Jul 08, 2024 | 7:38 PM

राज्यभरात पावसाने जोरदारा हजेरी लावली, रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचलं. वाढत्या पावसाचा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Follow us on

राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेल असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची पाहायला मिळाली. कारण रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं असून काही ठिकाणी पाण्याखाली ट्रॅक गेले आहेत. मध्यरात्री 12 ते 06.00 वाजेपर्यंत सुमारे 300 मिमीच्या मुसळधार पाऊस झाला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय

1007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ 8.07. 2024

12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ 8.07. 2024

12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ 8.07. 2024 ही ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. (इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द)