Rain : चार दिवस सहन करा घामाच्या धारा, येत्या रविवारपासून रिमझिम सरी बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Aug 03, 2022 | 9:00 AM

राज्यात पासवानं दडी मारली असली तरी आज ते शनिवार, 6 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिक वाचा....

Rain : चार दिवस सहन करा घामाच्या धारा, येत्या रविवारपासून रिमझिम सरी बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
चार दिवस सहन करा घामाच्या धारा
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : राज्यात पासवानं (Rain) दडी मारली असली तरी आज ते शनिवार, 6 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, मध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात जुलै महिन्यात दमदार आगमन करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सध्या दडी मारली असून आणखी चार दिवस मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहणार आहेत. मात्र रविवार 7 ऑगस्टपासून मुंबईसह कोकणात रिमझिम सरी बरसतील आणि हळूहळू पाऊस जोर पकडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेतील संशोधक सुषणा नायर यांनी वर्तवला आहे. राज्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांत महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम राहिल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीलाही सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसानं दडी मारल्यामुळे सगळयांना उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र, हे तापमान फार वाढलेले नाही.

हायलाईट्स

  1. आज ते शनिवार, 6 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज
  2. कोकण, गोवा, मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  3. आणखी चार दिवस असेच तापमान राहणार
  4. मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला
  5. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
  6. राज्यात जुलै महिन्यात दमदार आगमन करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सध्या दडी मारली
  7. रविवार 7 ऑगस्टपासून मुंबईसह कोकणात रिमझिम सरी बरसतील आणि हळूहळू पाऊस जोर पकडेल
  8. राज्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांत महापुराची परिस्थिती निर्माण झाली

मुंबईत 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या मध्येच तापमान आहे. खूप मोठ्या फरकानं वातावरणात बदल झाला आहे असे नाही. आणखी चार दिवस असेच तापमान राहणार असून पुढच्या आठवड्यापासून रिमझिम धारा बरसतील, अशी माहिती सुषमा नायर यांनी दिली.

विदर्भही कोरडा

राज्यात पासवानं दडी मारली असली तरी आज ते शनिवार, 6 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, विदर्भ कोरडाच राहणार आहे. कोही ठिकाणी मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.