मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर (Mumbai Rain) धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक (Western Railway) उशिराने सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह मुंबई आणि परिसरात वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र गणपती दर्शनासह दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जनही निर्विघ्न पार पडलं.
रात्रभर बरसलेल्या पावसामुळे मुंबईतील गांधी मार्केट, हिंदमाता, सायन सर्कल यासारख्या सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र सकाळच्या सुमारास साचलेलं पाणी ओसरायला लागलं.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागपूर, गोंदिया, मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं स्कायमेटने सांगितलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान अंदाज 4 सप्टेंबर: नागपूर, गोंदिया, मुंबई येथे मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित: https://t.co/r7eEctacu9 #Marathi #Maharashtra #Mumbai
— SkymetWeather (@SkymetWeather) September 3, 2019
मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Dear Mumbaikars,
The IMD authorities have indicated high rainfall weather for Mumbai and other adjoining districts for the next 2 days.
Please take adequate precautions and ensure safety.#Dial100 in case of an emergency.
Take care Mumbai.— Mumbai Police (@MumbaiPolice) September 3, 2019
गणपती विसर्जनाच्या वेळी भरतीच्या वेळांबाबतही मुंबई पोलिसांनी सूचना दिलेली. या काळात भावनेच्या भरात बाप्पाला निरोप देताना आपली सुरक्षितता धोक्यात आणू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी सर्व गणेशभक्तांना केलं आहे.
Dear Mumbaikars,
While bidding your favourite Bappa an emotional adieu, please do keep your safety in mind & note the tide timings while going for immersion to the sea/creeks.#Ganeshotsav2019#GaneshImmersion pic.twitter.com/bgjtItif3d
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 3, 2019