मुंबई : मान्सून (Mansoon) यंदा राज्यात लवकर दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज यंदा चुकीचा ठरला आहे. दोन दिवसापुर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याचं चित्र महाराष्ट्रात होतं. दोन दिवसांनंतर दडी मारलेल्या पावसाने पुन्हा आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाला जोरात सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना (Mumbai) उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता होती. नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील हलक्या पद्धतीचा पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून गायब झालेला पाऊस आज पडल्याने हवेत गारवा पसरला आहे.
वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. रिमझिम पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे. संपुर्ण परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे.
राज्यात लवकर पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली. परंतु एक दिवस पाऊस पडल्यानंतर दोन दिवस पाऊस गायब होता. दोन राज्यात अनेक ठिकाणी कडक ऊन होतं. नवी मुंबईत देखील काल हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे तिथही काही प्रमाणात उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. वातावरण ढगाळ असल्याने कधीही पाऊस पडू शकतो.
बुधवारी सांगली शहरासह उपनगरात पाऊसाची दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण सांगलीकराना मिळाला थोडासा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापूर्वी सांगलीत जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर सांगलीत प्रचंड उकाडा जाणवत होता. काल अचानक झालेल्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस कडक उन्ह असल्यामुळे नागरिक परेशान झाले होते. काल झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधान झाले आहेत. राज्यात लवकर पाऊस होणार असल्याने सांगली भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे पावसाळ्यापुर्वी आटोपली. तसेच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतात चांगलं पीक आलं आहे.