मुंबई : मिंधे सरकारने वेगवेगळी आश्वासन दिली. दहीहंडीला हे खेळाचे दर्जा देणार होते. पण कोणतेच आश्वासन सरकार पूर्ण करू शकले नाही. रस्त्यांसाठी 6 हजार कोटींचे टेंडर काढले. पण, त्याची कामे कुठेही दिसली नाही. मुख्यमंत्र्यांचे बाबा स्वागत करा, तक्रार काय करता? हे जे स्टेटमेंट होते त्याला अनुसरून विचारतो की आता तुम्ही ‘या’ घटनांच्या ठिकाणी देखील याचे स्वागत करा हाच प्रश्न विचारणार का? असा सवाल युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. रस्त्याचे घोटाळे बाहेर काढले, मुंबई तुंबली याला जबाबदार कोण? आर्थिक नियोजन कोणाचे चांगले ते बघा. खड्डे होणार नाहीत असा दावा जगात कोणी नाही करू शकत. पण यांनी केला… आता 33 देश त्यांची दखल घेतील असा टोलाही त्यांनी लगावला.
रस्ते घोटाळा आणि नाले सफाई यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. मिंधे सरकारने दिले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. रस्ते कामामध्ये सहा हजार कोटीचा घोटाळा आहे. गेल्या दीडशे वर्षात पन्नास रस्ते एवढंच टार्गेट ठेवले. सगळ्यात लहान टार्गेट आहे हे. लहान कामासाठी मोठे टेंडर असा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
नालेसफाईची, रस्त्याची कामे 31 मे पर्यंत पूर्ण होतात. त्यानंतर तात्पुरते काम साधारणपणे बंद करतो. मात्र, जी कामे अपूर्ण राहतात त्यांच्या नगरिकांना त्रास होत आहे. विनाकारण रस्ते खोदून ठेवले आहेत अशी लोकांची तक्रार आहे. जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मिंधे गटातील एकही पुढे आला नाही अशी टीका त्यांनी केली.
नालेसफाईची पाहणी करण्यासाठी आम्ही फिरलो. उद्धव ठाकरे स्वतः नाले सफाईची पाहणी करण्यासाठी प्रत्येक विभागात जायचे. किती पम्प चालू आहेत. किती नाहीत, कुठे पाणी साचेल अशी सर्व पाहणी करायचो. पम्प वाढवले अस घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले पण ते कुठेही दिसले नाहीत. जिथे जिथे पाणी तुंबले तिथे आम्ही जायचो, काम करून घ्यायचो. पण, यांचे हे स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
कर्नाटकमध्ये जे सरकार होते ते 40% भ्रष्ट होते म्हणू त्यांना जनतेने घरी बसवले. पण, महाराष्ट्रातले हे सरकार 100% भ्रष्ट आहे. मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. आमची पालिकेत सत्ता आली तेव्हा 600 कोटी फिस्क डिपॉझिट होते ते आम्ही 72 हजार कोटी सरप्लस आणले. मात्र, सरकारचा त्यावरही डोळा आहे.
सरकारने महापालिकेचे पैसे एलईडीलाईटमध्ये लावले आहेत. काही ठिकाणी लाईटचे काही मोर केले आहेत. त्यामध्ये पैसे लावले आहेत. जेवढ्या मिटिंग महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झाल्या तेवढ्या बैठका नियोजनासाठी झाल्या असत्या तर असे स्टेटमेंट द्यायची वेळ आली नसती अशीच टीका त्यांनी केली.