मुंबई : आज गुढी पाडव्याचा (Gudipadwa melava) सण, प्रत्येक मराठी माणसासाठी हा सण खास असतो. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी (Mns Gudipadwa melava) हा सण आणखीच खास असतो. कारण मनसेच्या गुढीपाढव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं करारी भाषण होत. राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडेही (Raj Thackeray Live) सर्वाचं लक्ष लागलं होतं. गेल्या वेळी पुण्यात मनसेचा वर्धापण दिन पार पडला. त्यामुळे पुण्यातून राज ठाकरेंनी विरोधकांना कडकडीत इशारा दिला होता. माझं आजचं वर्धापण दिनाचं भाषण म्हणजे केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर गुढी पाडव्याल शिवतिर्थावर तुम्हाला बघायला मिळेल, असे म्हणत राज ठाकरे गारा बरसतात तसे विरोधकांवर बरसले होते. आज तर राज ठाकरेंनी महाविकास आगाडीला थेट टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही खरपूस समचार घेतला आहे.
राज ठाकरे सत्य बोलत आहेत
मी सभा पूर्ण ऐकली नाही
पण तुम्ही सांगताय तसे बोलले असतील तर सत्यच आहे
सर्वात मोठा पक्ष बाहेर राहिला मात्र तीन पक्ष एकत्र येऊन लोकांची फसवणूक करत आहेत
तुम्ही जोपर्यंत घरी यांना बसवत नाही तोवर बदल होणार नाही
उद्या मी बेफिकरीने वागलो तर खाली बसवा
वचक हा जनतेचा असला पाहिजे
शिवरायांचे अनुयायी म्हणून वागताना समाज सुधारला पाहिजे
मुख्यमंत्र्यांवर राज ठाकरेंचा थेट निशाणा
मलाही ईडीची नोटीस आली गेला ना मी
आता संपत्ती जप्त यांची करायला सुरू केली तेव्हा जाग आली
आता मुख्यमंत्री बोलतात आता मला अटक करा
बाळासाहेबांच्या नावाखाली काहीही करत आहे
बाळासाहेबांचा फोटो लावून हजारो कोटी लूटत आहेत
बाळासाहेबांचं स्मारक बांधायचे असेल तर मोठं बांधा
तुम्हाला बंगला आवडा म्हणून घेऊ नका
रात्री सगळी तिकडेच असतात, परदेशी गाडी तिकडे लागतात
मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील
अन्यथा डबल आवाजाचे स्पिकर लावू
प्रत्येकाने धर्म घरामध्ये ठेवावा
आपल्याला गरजच नाही पाकिस्तानची
मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या घरातही कट दिसला का?
हल्ली हे कट वर चालतात
मग ईडीने कट केला, मग मुख्यमंत्री संतापले
यशवंत जाधव यांच्या घरात दोन दिवस रेड चालली
मोजत काय होते
आजकाल घरचे सांगत नाहीत यशवंत हो, बोलतात यशवंत जाधव हो
शहरात पुन्हा झोपडपट्ट्या वाढत होत्या
बाळासाहेब थोरातांचा फुकट घरं देण्याचा उद्देश चांगला होता
मात्र मुंबईत फुकट घर मिळतंय म्हणून बाहेरच्यांची गर्दी वाढली
गरिबांना घरं मिळाली पाहिजेत
साला आमदारांना कसली घरं वाटताय
आमच्या राजू पाटीलने पहिलं घर नाकरलं
मग आपण आमदारांची फार्महाऊस घेऊ आणि मग घर देऊ
आमदारांची पेन्शन बंद केली पाहिजे
आता कोणत्या आमदाराने घर मागवलं होतं, मग मुख्यमंत्र्यांना काय झालं?
मुघल आपलं काहीच हिरावून घेऊ शकले नाहीत
प्रत्येक राज्याने आपलं राज्य मोठं केल्यास देश मोठा होईल
हिदू मोठा होईल, पण एका राज्याला दुसरं राज्य ओरबडायचं आहे
आमच्याच लोकांचं आपल्या लोकांकडे लक्ष नाही
जेम्स लेन जन्माला आला
मग त्या भिकारड्याने पुस्ताकात काहीही लिहलं
राष्ट्रवादीच्या जन्माआधी तो कुठे होता
बाबासाहेब पुरंदरेंना मुद्दाम टार्गेट केलं जातं
बाहेरील संबंध नसणारी लोकं काहीही बोलतात
जातीपातीतून आपण बाहेर येत नाही
हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत
राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे
शरद पवारांना ही गोष्ट आहे
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद वाढला
आधी जात जातीचा अभिमान होता, राष्ट्रवादीने जातीय वाद पेटवला
नवाब मलिक जेलमध्ये जाऊनही सत्तेत आहेत
बदल हला असेल तर हे चालणार नाही
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये, असा कारभार असावा
राज्यात सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेना
शेतकरी आत्महत्या थांबेना
शिक्षणाची दुरावस्था सुरूच
नोकरीत पहिलं प्राधान्य हे मराठी माणसाला मिळालंच पाहिजे
बाकीचे नको इथे
दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये
पहिला मंत्री छगन भुजबळ जाहीर केला
ते दोन वर्षे जेलमध्ये होते
हे सगळं नकावर टीच्चून केलं जातं
नवाब मलिक जेलमध्ये गेले तरी अंगठा दाखवत आहेत
तुम्हाला भरकटवलं जातं
त्या बॉम्बच्या गाडीचं उत्तर अजूनही मिळत नाही
त्यानंतर कमिशनरला काढून टाकलं जातं
त्यानंतर तो म्हणतो गृहमंत्र्यांनं शंभर कोटी मागितले
आणि आपण केवळ बघत बसतो
रोज नवीन कायतर काढतात
रोज मीडियासमोर यांची पकपक सुरू
मूळ विषय बाजुला नेला जातो
सचिन वाझे शिवसेनेत होता
असा माणून जिलेटीन ठवतो
सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं
हे सहज होतं का?
अजित पवारांचा राज ठाकरेंकडून नक्कल
पाहटेच्या शपथविधीवरून खिल्ली उडवली
असा प्रकार कुठेही पाहिला नाही
व्यासपिठावर शिव्या घालता आणि पुन्हा मांडवर बसता
आणि खोटी कारणं सागता
मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं
राष्ट्रवादीसोबत जायला मतं नाही दिली
आधी जाहीर सभेत का नाही बोलला
अमित शाह यांच्याशी एकांतात का बोलला?
चार भिंतीत का गोष्टी केल्या?
अमित शहा यांनी असे बोलणे झाले नसल्याचे सांगितले
मग पाहटे उठून पाहतो तर जोडा वेगळात
पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच
गेली निवडणूक आठवा
सोबत कोण होतं आणि विरोधात होतं
निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला
अडीच अडीच वर्षे ठरली होती
दोन वर्षात मोरी जाम तुंबलीय
शक्य होईल तितकं आज साफ करु
सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा
साडेसहा वाजल्यापासून मी तयार होतो
सगळी सांगत होते की अजून लोक येत आहेत
त्यामुळे यायला उशीर झाला
आलेल्या सगळ्या सैनिकांचं दर्शन घेताना अभिमान वाटतोय
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात
काही मिनिटात राज ठाकरे बोलणार
राज ठाकरे थेट व्यासपीठावर दाखल
बाळा नांदगावकर यांच्या भाषणाला सुरूवात
कोणत्याही क्षणाला राज ठाकरे येतील
या राज्याला राज ठाकरेंची गरज आहे
तिघांचे सरकार आहे, त्यात एकमेकांचं पटत नाही
वेगवेगळी विचारधारा, वेगवेगळी दिशा
गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं पटत नाही
मंत्र्यांचं आपसात पटत नाही
त्यामुळे राज्याचा विकास होईना
मनसे आमदार राजू पाटील यांच्या भाषणाला सुरूवात
लोक मन की बात ऐकत असतील नसतील, मात्र मनसेची बात नक्की ऐकतात
राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष
राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरू-बाळा नांदगावकर
राज ठाकरेंना लोकांच्या समस्यचे जाण-बाळा नांदगावकर
कोरोनाकाळात लोकांना राज ठाकरेंचा आधार मिळाला
राज ठाकरेंनी अनेकांच्या समस्या सोडवल्या
लोक मातोश्रीवर नाही तर कृष्णकुंजवर जायचे
मनसेच्या नेत्यांकडून जनतेला साद
राज ठाकरेंना लवकरच आयोध्येला येण्याचे निमंत्रण
शिवतीर्थावर हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
काही वेळातच राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात होणार
Raj Thackeray live : राज ठाकरे थोड्याच वेळात संबोधित करणार https://t.co/ImprYi4Szf pic.twitter.com/Iol0YjpbDj
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
शर्मिला ठाकरे शिवतीर्थावर पोहोचल्या
राज ठाकरेंची मनसैनिकांना प्रतीक्षा
वादळी भाषणासाठी हजारो मनसेसैनिक दाखल
काही वेळातच राज ठाकरेही पोहोचणार
मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन
आज मनसेचा पुन्हा नवा निर्धार
शिवतीर्थावर जोरदार जल्लोष सुरू
सनई चौघडे वाजू लागले
प्रतीक्षा राज ठाकरेंच्या भाषांची
काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी बाल्कनीतून मनसेसैनिकांना अभिवादन केले
हजारो कार्यकर्ते पार्कवर दाखल
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, मनसेची टॅगलाईन
राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसेचा ट्रेलर
आजच्या पिक्चरमध्ये विलन कोण?
राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार यासाठी संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष सभेवर लागले आहे
मात्र प्रत्यक्ष शिवतीर्थावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणे,पालघर,भिवंडी ,कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई कडून शेकडो बसेस आणि खाजगी वाहनांनी मुंबईत दाखल झाले आहेत
राज ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार
आम्हाला गर्दीची चिंता नाही
हा गुढीपाडवा उत्साहाचा आणि जल्लोषाचा आहे
कारण करोनाचे सगळे निर्बंध उठले आहेत
दोन वर्षानंतर मनसैनिकांना भेटणार आहोत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सौ.शर्मिला राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्यानिमित्ताने गुढी उभारली. यावेळी मनसे नेते श्री.अमित राज ठाकरे व सौ.मिताली अमित ठाकरे यांनीही गुढीचे पूजन केले व शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी वसई विरार मधून शेकडो मनसे सैनिक दादरच्या दिशेने रवाना झाले आहे. विरार मनवेलपाडा, कारगील नगर, चंदनसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई वालीव, गोखीवरे या परिसरातून मनसे कार्यकर्ते गेले आहेत. काहीजण बस तर काहीजण लोकलने गेले आहेत.
मुंबईत मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या भाषणासाठी स्टेज सजला
मनसैनिकांना उत्सुकता राज ठाकरेंच्या भाषणाची
आज पुन्हा शिवतिर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
काही वेळातच राज ठाकरेंचं भाषण होणार
मनसेचा मंच सजला