राज ठाकरे, नारायण राणे यांची भेट, अरविंद सावंत म्हणतात, एकत्र येण्यानं काही…

| Updated on: Dec 31, 2022 | 6:49 PM

हे भुरटी लोक आहेत. बिन बुडाची पेंदी आहेत. कुठेही जातात, असा समाचार अरविंद सावंत यांची राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीवर घेतला.

राज ठाकरे, नारायण राणे यांची भेट, अरविंद सावंत म्हणतात, एकत्र येण्यानं काही...
अरविंद सावंत
Follow us on

मुंबई : 2022 हे वर्ष राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वाईट होते. आपण फार मागे गेलो. सत्तांतर झाले त्याचे दुःख नाही. पण ज्या पद्धतीने ते झाले त्याचं मात्र नक्कीच दुःख आहे. फक्त सत्ता मिळण्यासाठी भाजपनं डाव खेळला. काहीही करा पण सत्ता मिळवा, आम्ही तुमच्या मागे आहोत, असं सारं होतं. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. कोंडी शिवसेनेची नाही तर सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांची झाली. जे लोक एकमेकाला शिव्या घालत होते ते आज एकत्र जेवण करत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही.

हे भुरटी लोक आहेत. बिन बुडाची पेंदी आहेत. कुठेही जातात, असा समाचार अरविंद सावंत यांची राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीवर घेतला.

अब्दुल सत्तार यांच्यावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले, स्वार्थासाठी गेलेली ही लोक आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खडसे यांच्यावर आरोप झाला होता. त्यावेळी लगेच त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. त्याच्यापेक्षा गंभीर आरोप आता मंत्र्यांवर आहेत, तरीसुद्धा ते राजीनामे घेत नाहीत. सत्तेची लाचारी कशी आहे हे यातून स्पष्ट होते.

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावर होणाऱ्या आणि त्यांचे आमदारावर होणाऱ्या आरोपांची चौकशी करावी. आधी त्यांच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना मारझोड केली, त्याची आधी चौकशी करा, अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली. ते म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे लोक आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.