उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाही. सारखं वाघं नखं काढतात. इथून अब्दाली आले… अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पा वेगळंच सुरू आहे. एकनाथ शिंदे. मी असा महाराष्ट्र नाही पाहिला कधी. कुणामुळे निवडून आला, कोणी केलं. कशासाठी केलं. सध्या काय करता, अशी विचारधारा पाहिले नाही. आता राष्ट्रवादीत आहे, तो उबाठाकडे तिकीट मागतो, तुतारीत जाईल नाही तर आपल्याकडे येईल. मला कळत नाही यांच्या घरचे तरी यांना कसे साथ देतात. येणाऱ्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहोत, महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेणार आहोत, आपल्याला काय समजतंय, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेचा कार्यक्रता मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करत आहेत.
आमचे आमदार फुटतात, खासदार फुटतात, कुणावर विश्वास बसत नाही. विश्वास बसवत नाही. आता आहे हा इथे जाईल कि तिथे जाईल. अशी परिस्थिती राज्यात कधीच नव्हती. आम्ही यादी पाहत होतो. प्रत्येकवेळेला विचारावं लागत होतं, हा आता कुठे आहे. काही निष्ठाबिष्ठा नावाची गोष्ट आहे की नाही. राज्यातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाही, तुमचे काय राहणार आहेत. ही अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंच्या हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसले. मी त्यांच्यासमोर त्यांनाही जाऊन सांगितलं. मागणी आहे ना, कशी करायची तेही सांगा. हा किचकट आणि टेक्निकल विषय आहे. त्यातून आता मार्ग काढता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार यांच्यापासून सर्वांना माहीत आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. अरे देऊ शकत नाही बाबा. तुमच्या हातात पॉवर नाही. करू शकत नाही. तामिळनाडूतील विषय कोर्टा रेंगाळत आहे. मराठी मुलांना कामं कशी मिळतील, नोकरी कशी मिळेल. उद्योग कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न करा. फुकट कसले पैसे वाटताय. हे काही रॉकेट सायन्स नाही. सहज शक्य आहे. पण खोट्या गोष्टी सांगून तुमच्या भावनानां घात घातला जात आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.