मुंबई : अलिकडेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका चांगलीच उचलून धरली आहे. अशातच भाजप नेत्यांकडूनही राज ठाकरेंचं कौतुक सुरू आहे. भाजप नेते राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेलाही खुलेपणे पाठिंबा देत आहे. काही दिवसातच राज्यात बड्या महापालिका (Bmc Election) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. आणि अशा वेळी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला आहे, तसेच राज ठाकरेही भाजपबाबत टीकेचा चकार शब्दही काढत नाही, उलट योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत आहेत. तर महाविकास आघाडीवर अवकाळीत बरसलेल्या गारा बरसाव्या तसे बरसत आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांणी जोर धरला आहे. अशात राज ठाकरेंची गाडी भाजप कार्यलयासमोर दिसून आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. हा नेमका प्रकार काय आहे, याचाही शोध आम्ही घेतला आहे.
राज ठाकरे यांची गाडी आज भाजप च्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यलया बाहेर उभी राहिली आणि सर्वांच्या भुवया एकदम उंचावल्या .एम एच 46 जे 9 गाडी चा नंबर आहे. 9 हा राज ठाकरे यांचा लक्की नंबर आहे, हे सर्वश्रुत आहेच. या गाडीत राज ठाकरे यांनी अनेकवेळा प्रवास केलाय. राज ठाकरे यांची गाडी भाजप कार्यलय समोर कशी काय असा प्रशन सर्वानाच पडला? तर अशी माहिती समोर आली की एस के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे यांना ही गाडी विकली असल्याचे कळाले. कोठावळे हे त्यांचे सहकारी सहदेव पाटील यांना घेऊन भाजप प्रदेश कार्यालयात आले होते. आपण ही गाडी 14 डिसेंबरला राज ठाकरे यांच्याकडून विकत घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच ही गाडी आज भाजप प्रदेश कार्यालयात येण्याचा योगायोग आहे, असे स्पष्टीकरण एस. के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे आणि सहदेव पाटील यांना दिले आहे. सहदेव पाटील हे भाजपचे कार्यकर्ते असून रियल इस्टेटचा बिजनेस देखील आहे. सहदेव पाटील म्हणतात 9 नंबर त्यांचाही लकी नंबर आहे आणि राज ठाकरेंची वापरात असलेली गाडी घेण्याचं आकर्षण देखील होतं, त्यामुळे ही गाडी या ठिकाणी कशी आली याचा सस्पेन्स संपला आहे. मात्र काही काळ तर राज ठाकरे भाजप कार्यालयात पोहोचले की काय? असा ससपेन्स या गाडीने तयार केला होता.