मुंबई : अभिनेता सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा किस्सा सांगितला. बाबासाहेब पुरंदरेंना मी प्रश्न विचारला होता. इतकी वर्ष तु्म्ही शिवाजी महाराजांवर सांगता. तुम्हाला कधी वाटलं का की, तुम्ही महाराजांच्या अगदी जवळ आहात. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, एकदा महाराज लाल किल्ल्यावर आले. ते स्वयंपाक घराच्या मार्गानं आतमध्ये गेले. हळूचं दरवाजा उघडला. मी तीथं आहे. माझ्या मागे महाराज आहेत. रमजानचा महिना होता. शाहिस्तेखानाचे सेवक आहेत. रात्री दोन-अडीचची गोष्ट असेल. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की मला माहिती होतं की, आता यांना कापणार. यांना मारल्याशिवाय महाराजांना आतमध्ये जाता येणार नाही. त्यावेळी महाराजांनी मला पुढं ढकललं आणि सांगितलं की, पुढं व्हा. आणि मी दचकून उठलो, असं बाबासाहेब पुरंदरे यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. हा किस्सा राज ठाकरे यांनी आज सांगितला.
राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडं कोणती विलक्षण माणसं होऊन गेलीत. हे सर्वदूर पोहचविलं पाहिजे आपण. त्याऐवजी आपण सांगतो हे आमचे. हे नाव तुम्ही नाही घ्यायचं. हे आमचे यांचं नाव तुम्ही नाही घ्यायचं. काहींना त्याच्यात आनंद मिळतो. काहींना राजकीय फायदा मिळतो. आपण महान पुरुषांना जातीत कसले बांधतोय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीतील लोकांना जवळ घेऊन त्यांनी स्वराज्याची मांडणी केली. त्यांना आपण जातीत कसं बांधू शकतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. लोकमान्य टिळकांना तेल्या तांबोड्यांचे नेते म्हणायचे. त्यांना आपण ब्राम्हण म्हणतोय. कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवला. काय आपण या महाराष्ट्राचं करून ठेवलं.
दूरदर्शनला एक कार्यक्रम चालायचा. आमची माती आमची माणसं. ते नाव बदललं पाहिजे. आमच्या माणसांनी केलेली आमची माणसं असं केलं पाहिजे. शिर्षकचं बदललं पाहिजे.
शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न बघीतलं. महाराजांचे शिलेदार असता तर, मला त्यांचा घोडाही व्हायला आवडलं असतं. आपण त्या काळात व्हायला पाहिजे होतं. महाराजांचा एकदा स्पर्श व्हायला पाहिजे होता, अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.