राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी; प्रवीण दरेकरांचा सल्ला

| Updated on: Jul 17, 2021 | 1:00 PM

मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी. (pravin darekar)

राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी; प्रवीण दरेकरांचा सल्ला
pravin darekar
Follow us on

मुंबई: मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. (raj thackeray should take broad approach, says pravin darekar)

प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले.

जुल्मी कारवाई अयोग्य

कुरारमध्ये झोपडपट्टीवासियांवर करण्यात आलेल्या कारवाईचा दरेकर यांनी निषेध नोंदवला. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण पावसात जुल्मी पद्धतीने कारवाई करणं योग्य नाही. जुल्मी कारभाराची पद्धत अयोग्य आहे. लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणं ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असं सांगतानाच फडणवीस सरकारच्या काळातील कामांचं

सहकारावर चर्चा शक्य

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अनेक नेते अटकेच्या प्रतिक्षेत

यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरही भाष्य केलं. ईडीच्या कारवाया सुरू आहेत. अनेक नेते अटकेच्या प्रतिक्षेत आहेत, असं विधान त्यांनी केलं आहे.

दरडी कोसळणाऱ्या गावांचं सर्वेक्षण करा

रत्नागिरीत भुस्खलन झालं आहे. कोकणात सतत पाऊस सुरू आहे. पावसात कोकण उद्ध्वस्त होत असतो. त्यामुळे कोकणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या गावांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असते त्याचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वेळीच सावध होण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. (raj thackeray should take broad approach, says pravin darekar)

 

संबंधित बातम्या:

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

Karnataka CM Resignation: येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार?; वाचा कारण काय?

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

(raj thackeray should take broad approach, says pravin darekar)