मुंबई – राज ठाकरे यांनी आज गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून… आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका लागतील. पण, मला निवडणुकीचं वातावरण दिसत नाही. गेल्या १५-१६ वर्षांत पक्ष म्हणून काही भूमिका घेतल्या. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलनापेक्षा सर्वात जास्त यश मिळालं आहे. मनसेतर्फे काही यंत्रणा राबविल्या जातात. जी आंदोलनं होती ती विस्मरणात कशी जातील, यासाठी काही यंत्रणा काम करतात, असा आरोपही त्यांनी केला.
टोलचं आंदोलन घेतलं होतं. अटक झाली. टीकेची झोड उठली. पण, ६५ टोलनाके बंद झाले. फक्त निवडणुकीत सांगितलं, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. पण, त्याचं काही झालं नाही. आंदोलन करत नाहीत. भूमिका घेत नाहीत. त्यांना कोणी विचारत नाही, असंही ते म्हणाले.
रेल्वेचं आंदोलन झालं. मनसेचं टोलविरोधी आंदोलनं लोकं विसरले नाहीत. रेल्वेच्या परीक्षा द्यायला आलोत. महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. तिथं बाचाबाची झाले. मनसे सैनिकाला आईवरून शिवी दिली. त्यानंतर पुढचा हंगामा झाला.