राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर करत अनेक मुद्यांवर भाष्य केले. मुंबईत शिवतीर्थावर त्यांनी मनसेची राजकीय भूमिका स्पष्ट केली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आता यानंतर राज ठाकरे यांची तोफ प्रचार सभातून धडाडणार आहे. लोकसभेत मनसे उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण विधानसभेच्या मैदानात मनसे उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी लगावला.
ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी
सध्याच्या परिस्थितीत मोदींकडून अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. या देशाची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणार आहे. आपण खड्ड्यात जाणार की वर जाणार. उद्या अनेक निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काय होईल. कोथळे बाहेर काढतील. याचं कारण महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी हाणला.
व्याभिचाराला मान्यता देऊ नका
तरुण हेच फ्युचर
जगात सर्वात तरुण देश आपला देश आहे. जपान ना , अमेरिका. फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. व्यवसायाची गरज आहे. मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. १८ वर्ष निघून गेली. उरली १० वर्ष. दहा वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर होणार. मोदींना विनंती आहे, भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे. भविष्य आहे.