मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपासाठी (Mumbai Municipal Corporation) सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सप्टेंबरमध्ये राज्यातील मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झालेलं आहे. उभेच्छुक कामाला लागले आहेत. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यानं त्यांना दुसरीकडं मार्ग शोधावा लागत आहे. पक्षाचं अधिकृत तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. आसावरी पाटील या 14 मधून भाजपच्या उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष वेगवेगळे स्वतंत्रपणे लढले होते. यावेळी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळं वेळेवर कोणता राजकीय पक्ष एकत्र येतो. त्यांच्यात कशा आघाड्या तयार होतात. यावर राजकीय आराखडे तयार होतील.
वॉर्ड 14 म्हणजे राजेंद्रनगर 2017 च्या निवडणुकीत स्त्रीयांसाठी राखीव होता. एकूण 20 हजार 831 मतं वैध ठरली होती. भारतीय जनता पक्षाच्या आसावरी पाटील या निवडून आल्या होत्या. एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी महाविकास आघाडी होते की, आघाडीत बिघाडी होते, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.
भाजप – आसावरी पाटील – 8321
शिवसेना – भारती कदम – 7180
काँग्रेस – रश्मी मेस्त्री – 1844
राष्ट्रवादी – शुभांगी निकम – 650
मनसे – निशा गुजर – 2224
संभाजी ब्रिगेड – दैवता जाधव – 87
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
वॉर्ड 14 ची लोकसंख्या 51 हजार 477 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची 4130, तर अनुसूचित जमातीची 1058 होती. वॉर्ड क्रमांक 14 मध्ये राजेंद्र नगर, एफसीआय, खटाव इस्टेट, संस्कृती काम्प्लेक्स या भागांचा समावेश होतो. नवीन युवा मतदार कुणाला जास्त मतदान करेल, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.