Corona Vaccine | मुख्य डेपो ते आठ डेपो, तुमच्यापर्यंत लस कधी पोहोचणार, राजेश टोपेंनी मायक्रोप्लॅन सांगितला

| Updated on: Jan 13, 2021 | 12:10 PM

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोना लस दाखल झालेली आहे, अशी माहिती दिली. ( Rajesh Tope Corona Vaccine)

Corona Vaccine | मुख्य डेपो ते आठ डेपो, तुमच्यापर्यंत लस कधी पोहोचणार, राजेश टोपेंनी मायक्रोप्लॅन सांगितला
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात कोरोना लस दाखल झालेली आहे, अशी माहिती दिली. कोरोना लस राज्यातील आठ उपसंचालक कार्यालयांमध्ये लस पोहोचत आहे. पुण्यातील मुख्य डेपोपासून ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर येथे आज पोहोचेल. जिल्ह्याचे अधिकारी तिथून रेफ्रिजडेटेड व्हॅनमधून लस घेऊन जातील. ही प्रक्रिया 14 जानेवारीपर्यंत पोहोचेल. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालाय , प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत 15 जानेवारीपर्यंत पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला लसीकरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. त्यानंतर लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope explained how corona vaccine reach to Primary Health Center)

पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लसीकरण

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस दिली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात पुढाकार घ्यावा. कोरोना लसीला नाही म्हणू नका, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. जगभर कोरोना लसीकरणचा कार्यक्रम सुरु आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत लस सुरक्षित असल्याचा संदेश पोहोचवा, असंही ते म्हणाले.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स

पहिल्या टप्प्यात आपल्याला 55 टक्के लोकांना पुरेल इतकी लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्राला 17 लाख 50 हजार डोस गरजेचे आहेत. महाराष्ट्राला सध्या 9 लाख 50 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. भारत बायोटेककडून 20 हजार डोस उपलब्ध झालेत. यामुळे 55 टक्के लोकांना लस देण्यात येईल. लसीचे दोन डोस देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला लस देणार आहे.

सर्वसामान्यांना लस कधी मिळणार

सर्वसामान्यांना लस कधी मिळणार याचा निर्णय केद्र सरकार घेईल. पहिले तीन टप्पे झाल्यानंतर सर्वसामान्यांना लस देण्यात येतील. केंद्र सरकारनं लसीकरणाचा कार्यक्रम त्यांच्या अखत्यारित राबवावा. अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणारे, गरोदर महिला आणि अ‌ॅलर्जी असणाऱ्यांना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे काय म्हणाले?

संबंधित बातम्या:

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण, अदर पुनावालांकडून संपूर्ण टीमचा फोटो शेअर

(Rajesh Tope explained how corona vaccine reach to Primary Health Center)