मुंबई : आज राज्यात मोठे निर्णय जाहीर झाले आहेत. यामध्ये सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व कोरोना निर्बंध (Unlock Maharashtra) हटवण्यात आले आहेत. यातच मुंबई लोकलसंबंधी (Mumbai Local) एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीसारखे आता लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस (Vaccination) झालेले असणे आवश्यक नाही. आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र यावेळी लसीकरण पूर्ण करून घ्या असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठणकावले आहे. मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी रक्तवाहिन्यांसारखी काम करते. प्रवासाचे जलद आणि स्वस्त साधन म्हणून मुंबई लोकलकडे पाहिलं जातं आता तो प्रवासही सर्वांसाठी खुला झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांमध्ये या निर्णयमुळे आनंदाचे वातावरण आहे.
दोन डोसची अट जरी हटवण्यात आली असली तरी गाफील राहून चालणार नाही, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागेल. पूर्ण निष्काळजीपणे वागून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपलं लसीकरण पूर्ण करून घ्या, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बजावले आहे. महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
अमेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला आहे. बईच्या शोभायात्रा आपल्याला साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. मास्क लावणे जरी ऐच्छिक असले तरी सर्वांनी खबरदारी म्हणून मास्क लावा. गर्दीच्या ठिकाणी अजूनही आपण आपल्या आरोग्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत असेही टोपे म्हणाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून आपण निर्बंधात आहोत, मात्र आता अखेर उद्यापासून पूर्ण मोकळीक मिळणार आहे.
Maharashtra Covid 19 Restrictions News : ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट, कोरोना निर्बंध हटवले