मुंबई: राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनविरोधात (Lockdown) घेतलेली भूमिका ही पश्चातबुद्धी आहे. महाविकासआघाडीने त्यांना राज्यपाल कोट्यातून उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना आता हे ज्ञान आले आहे, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)
ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाला पुन्हा एकदा विरोध दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर पॅकेज जाहीर करून लोकांच्या खात्यात पैसे टाका. राज्य सरकारकडे मनरेगा आणि जनधन योजनेचा पूर्ण डेटा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन लोकांच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.
देशव्यापी लॉकडाऊनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मात्र, संजय राऊत यांची स्मरणशक्ती तोकडी आहे. केंद्र सरकारने राज्यांना कर्ज काढण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा पर्याय न स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. भाजपच्या नेत्यांचं नको पण सरकारने किमान पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे ऐकावे. त्यांनीही लॉकडाऊन झाल्यास आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?
Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान
मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन
(BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)