मुंबई : इकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) हलचाली वाढल्या असताना हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्यासह सोबतच्या आमदारांच्या मतांचा सस्पेन्स काय ठेवला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यामय घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) शंभर टक्के खूश नाही म्हणत पहिला बॉम्ब टाकला. तर त्यानंतर भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे उबरे झिजवायला सुरू केले. भाजप उमेदवार धनंजय महाडिक सर्वात आधी ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले. सर्वात आधी ठाकूर आणि त्याच्यासोबतचे आमदार भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिष्टमंडळ ठाकूर यांच्या भेटीला पोहोचलं. त्यांच्यात बंद दाराआड जवळपास चार तास चर्चा झाली. मात्र यातला मजकूर मात्र गुलदस्त्यात राहिला.
आज हितेंद्र ठाकूर यांनी सावध पवित्रा घेत अदांतरी प्रतिक्रिया दिला आहे आणि त्यांच्या मतांचा सस्पेन्स हा अजूनही काय ठेवला आहे. त्यामुळे शिवसनेच्या गोटातलं टेन्शन सध्या वाढलं आहे. आमचे तिन्हा आमदार एकत्र बसतील आणि आम्ही चर्चा करू की कोण आपले प्रश्न सोडवेल. केंद्रातील सरकार किंवा राज्यातील सरकार आमचे प्रश्न सोडवणार यावर सविस्तर विचार विनीमय होईल. त्यानंतर 10 तारखेला आम्ही सांगू आम्हाला कोणाबरोबर जायाचे ते, तसेच आम्ही सर्वासमोर मतदान करू, असे म्हणत त्यांनी या आपल्या मतांबाबत साध भूमिका घेतली आहे.
अनिल परब आणि रईस शेख यांच्या भेटीबाबत शेख यांना विचारले असता ते म्हणाले, अनिल परब माझे मित्र आहेत, त्यामुळे भेट होत असतात. ज्या किमान समान कार्यक्रमावर हे सरकार बनलं त्यापासून वेगळं झालीय? सर्व धर्माला सोबत घेऊन चालणार, हे या सरकारच्या किमान समान कार्यक्रमात होतंय. गेल्या काही वर्षांत मुख्यमंत्री हिंदूत्त्व हिंदूत्व करत आहेत. त्यामुळे हे सरकार सेक्यूलर राहीलं का? याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्षष्ट करावे, तसेच अडीच वर्षांत अल्पसंख्यांकांसाठी काय केलं? हे विचारण्याची वेळ आलीय. यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
तर महाविकास आघाडी सरकारने बोलावलेल्या आजच्या बैठकीत आम्ही जाणार असं वाटत नाही. भाजपसोबत आमची वैचारीक बाब जुळत नाही. अडीच वर्षांत सरकारमध्ये बदल झालाय. या सरकारचं सेक्यूलर तत्व कायम असणार का? सरकारकडून उत्तरं मिळाली नाही, तर सपाची भुमिका अबू आझमी ठरवणार, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून काय भूमिका मांडतात, हे महत्त्वाचं नाही. पण मुख्यमंत्री म्हणून काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे, असेही शेख म्हणाले आहेत.