मुंबईः राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Death) यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमधील (portfolio) बहुतांश शेअर मंगळवारी शेअर बाजाराच्या (Share Market) प्रारंभीच घसरल्याचे दिसून आले. Aptech Ltd मध्येही सर्वात मोठी घसरण दिसून आली. प्रारंभी व्यापाराच्या दृष्टीने ते सुमारे 5 टक्क्यांनी घसरले होते तर स्टार हेल्थच्या शेअरमध्येही घट झाली. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 32 शेअर् होते. राकेश झुनझुनवाला यांनी टाइट कंपनीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली होती तर आजाच्या शेअर मार्केटमध्ये आज प्रारंभीच्या व्यवहारात त्याच्या शेअरमध्ये 1.54 टक्क्यांची घसरण झाली होती. टायटन कंपनीचे शेअर बीएसई सेन्सेक्सवर रु. 2,433 वर व्यवहार चालू होता.
जून तिमाहीच्या शेवटी, झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे टायटनमधील 5.10 टक्के शेअरसह 11,086.9 कोटी रुपयांचे शेअर्स होते. 12 ऑगस्ट रोजी टायटनचा स्टॉक 0.01 टक्क्यांनी वाढून 2,471.95 रुपयांवर बंद झाला होता आणि फर्मचे मार्केट कॅप 2.19 लाख कोटी रुपये झाले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांच्याकडे भारतातील मल्टी-ब्रँड फुटवेअर रिटेल चेनमध्ये 3,348.8 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. जून तिमाहीच्या अखेरीस त्यांनी या फर्ममध्ये 14.40 टक्के शेअर घेतला होता. Aptech Ltd, ज्याची बिग बुलमध्ये 23.40 टक्के भागीदारी होती किंवा Q1 मध्ये 225 कोटी रुपयांची गुंतवणूक होती, तिचे समभाग आज बीएसईवर 3.67 टक्क्यांनी घसरून 224.20 रुपयांवर सुरू होते.
स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवसाच्या क्लोज प्राईजच्या तुलनेत आज त्याचा शेअर एक टक्क्याने घसरला. तर सुरुवातीच्या बाजारात तो 662.75 रुपयांवर व्यवहार करत होता, तर तो 696.10 रुपयांवर बंद झाला. आज तो 660 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रवर्तक होते. तर 12 ऑगस्ट रोजी शेअर 0.40 टक्क्यांनी वाढून 696.10 रुपयांवर बंद झाला.
क्रिसिल लिमिटेडचा शेअर बीएसईवर 0.56 टक्क्यांनी घसरून 3,243 रुपयांवर पोहोचला होता, जो आधीच्या 3261.60 रुपयांवर बंद झाला होता. झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत क्रेडिट रेटिंग फर्ममध्ये 1,301.9 कोटी रुपयांची हिस्सेदारी ठेवली होती. 12 ऑगस्ट रोजी त्याचे शेअर 1.30 टक्क्यांनी घसरून 3,261.60 रुपयांवर बंद झाले होते. मेट्रो ब्रँड्समध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली
राकेश झुनझुनवाला यांनी 32 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. 12 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार या कंपन्यांमधील त्यांच्या शेअरची एकूण किंमत 32,000 कोटी रुपये होती. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओबद्दल सांगायचे तर, त्यांनी स्वतःची फर्म Rare Enterprises स्थापन केली आणि त्याद्वारे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.
राकेश झुनझुनवाला यांना ‘बिग बुल’ बनवण्यात टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सचा मोठा वाटा होता, ज्यांनी 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच शेअरचा भाव 43 रुपयांवरून 143 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर त्यांनी 2002-03 मध्ये टायटनचे शेअर्स सरासरी फक्त 3 रुपये किंमतीत खरेदी केले होते मात्र सध्या तेच टायटन स्टॉक्सची किंमत 2,400 रुपयांपेक्षा जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.