मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर गेल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही त्यांच्यावर टीका केली आहे. तर विरोधकांच्या या टीकेला सत्ताधारी गटातील मंत्र्यांपासून ते आमदार, आणि नेत्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांनी टीका केल्यानंतर आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून अयोध्येला आलो असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अगदी नाना पटोले यांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रामदास कदम यांनी म्हटले आहे की, आम्ही अयोध्येला आलो आहे कारण, शिवसेना प्रमुखांची दोन स्वप्नं होती. त्यातील पहिलं स्वप्न होतं. 370 कलम रद्द करण्यात आले आणि राम मंदिर उभारणी करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं होती.
ती स्वप्न आता पूर्ण होत असल्याचेही राम कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी ती स्वप्नं पूर्ण केली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच पक्ष आणि शिवसेनेच्या चिन्हावरूनही त्यांनी ठाकरे यांना छेडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी ते म्हणाले की, नुकताच न्यायालयाचा निकाल आला.
त्यामध्ये धनुष्यबाण आम्हाला मिळाले आहे. तसेच राम आणि धनुष्यबाण हे कोणीचं वेगळं करू शकत नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच आम्ही रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला आलो आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी त्यांनी रावणाचा विचार स्वीकारला होता असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
तसेच आदित्य ठाकरे यांनी रावणाचे राज्य करून हे अयोध्या दौऱ्याला निघाले असल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, रावण कोण, राम कोण हे आता पाहायची वेळ नाही मात्र आम्ही इथे फक्त भक्तीसाठी आलो आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न पाहिले होते, ते शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. मात्र मोठ मोठी स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली का उतरावं लागलं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले, त्याचवेळी त्यांनी ते पाप केले होते.म्हणून मागच्यावेळी ते इथे आले होते. त्यावेळी झालेले पाप धुण्यासाठीचे ते आले होते असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.