मुंबईः महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची कन्नडिगांनी केलेल्या तोडफोडीमुळे महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापले आहे. त्यातच सांगली, सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर ठपका ठेवण्यात येत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद वाढळ्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटकातील न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाकरे गटावर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली होती.
तर आता त्याच दिलेल्या नोटीस संदर्भात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्हाला एक बेळगावची नोटीस आली तर तुमची पॅन्ट पिवळी झाली असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
त्यामुळे सीमावादावरून आता शिंदे-ठाकरे गट भिडणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना तुमची पँट पिवळी झाली असा टोला लगावल्यानंतर त्यांनी मला बेळगावमध्ये अटक झाली होती तरी मी घाबरलो नाही असंही त्यांनी संजय राऊत यांना सांगितले आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक हा वाद बाजूला राहून आता शिंदे-ठाकरे गटातील वादही उफाळून येऊ लागले आहेत.
ठाकरे गटावर आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तुम्ही फक्त बोलता पण एकनाथ शिंदे सत्तेत आल्यानंतर त्यांनी किती निर्णय घेतले हे तुम्ही बघत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
विरोधक म्हणून ठाकरे गटाकडून ज्या वेळी शिंदे गटावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जाते. त्या टीकेला उत्तर देताना रामदास कदम यांनी शिंदे-फडणवीस यांची बाजू घेत म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस हे सक्ख्या भावासारखे काम करत आहेत. त्यामुळे टीका करताना त्यांनी जपून टीका करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.