‘मी तुला आतून बाहेरून ओळखतो…’; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकर यांचं सूचक ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Jul 22, 2024 | 6:54 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकर यांच्या ट्विटने चर्चांणा उधाण आलं आहे.

मी तुला आतून बाहेरून ओळखतो...; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकर यांचं सूचक ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Follow us on

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्यचं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितलं आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अशातच रविकांत तुपकर यांनी ट्विट केलं आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो, असं रविकांत तुपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्यात.

22 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून असा निर्णय धक्कादायक आहे. राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये का दुरावा निर्माण झाला हे मला माहिती नाही. कांदा आणि धानासाठी आंदोलन केले ही आमची चूक आहे का? राजू शेट्टींनी असा निर्णय घेतील मला अपेक्षित नव्हतं. 24 तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेणार आहोत. संघटनेत मी कायम सक्रिय होतो सक्रिय नव्हतो असं म्हणत असतील तर ते खोटं असल्याचं रविकांत तुपकर म्हणाले.

 

लोकसभेत राजू शेट्टी याचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटना नेते रविकात तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही,त्यांना संघटेने त्यांना लाल दिवा दिला,पद दिले.एकदा पक्ष सोडला परत आले,काम करत राहिले,अलीकडे तीन ऊस परिषद उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. शिस्तभंग समिती नेमली त्यांना पत्र दिलं ते आले नाहीत,सदाभाऊ यांना पण आणले होते समिती समोर, सदाभाऊ मंत्री असताना आले होते शिस्तपालन समिती समोर उत्तर दिली. पक्ष राज्य कार्यकारणीला पण तुपकर उपस्थितीत राहिले नाहीत, रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्याच काम केलं. राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिलेतुपकर याच्यामुळे चळवळीचे नुकसान होत आहे. शिस्तपालन समितीपुढे सदाभाऊ आले,पण तुपकर आले नसल्याचं जालिंदर पाटील यांनी म्हटलं आहे.