गुवाहटी: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) मुंबई-सूरत आणि सुरतहून थेट आसामधील गुवाहटीत दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी देशातील सगळ्या माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. बंडखोरी करण्याच्या आधीपासूनच म्हणजेच विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते निकालापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींची दखल टीव्ही नाईन मराठी सगळ्याआधीच घेतली आहे. गुवाहटीतील (Guwagati Tour) रेसिडन्स ब्लू हॉटेलमधील बंडखोर आमदारांमध्ये नवीन सहभागी होणारे आमदार, त्यांच्या बैठका, त्यांचे निर्णय आणि प्रस्ताव यांची परिपूर्ण माहिती टीव्ही नाईन मराठीचे गजानन उमाटे (Reporter Gajnan Umate) यांनी पोहचवली आहे.
आजही एकनाथ शिंदे सहाव्या दिवशी ज्यावेळी हॉटेलच्या परिसरात आले, त्यावेळी अनेक माध्यम प्रतिनिधी त्यांना पुढील दिशा काय असणार याविषयी विचारणा केली असली तरी त्या गर्दीतूनही बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी पुढे होत टीव्ही नाईनचे गजानन उमाटे कहां है अशी विचारपूस करत त्यांची चौकशी केली.
ज्यादिवसापासून शिवसेनेचे नेते, मंत्री आणि गटनेते पदावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेच्या निकालानंतर ते काही काळ नॉटरिचेबल होते, त्यानंतर ते सूरतमध्ये असल्याचे समजल्यानंतर सूरतमधील घटनांपासून ते अगदी गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदार पोहचण्यापर्यंत इत्थंभूत बातमी गजानन उमाटे यांनी पोहचवली.
आजही गजानन उमाटे यांनी एकनाथ शिंदे हॉटेलपरिसरात दिसल्यानंत एकनाथ शिंदे यांना भाई म्हणून हाक मारली त्यानंतर एकनाथ शिंदे आपण लवकरच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माध्यमांनी प्रतिक्रिया देण्याआधी त्या गर्दीतही आमदार एकनाथ शिंदे यांनी गजानन कहां है अशी विचारपूस करत त्यांची चौकशी केल्याचे दिसून आले.
पत्रकार गजानन उमाटे यांची विचारपूस केल्यानंतरच आमदार एकनाथ शिंदे यांनी पुढे होत आपण लवकरच मुंबईला परतणार असल्याची माहितीही दिली होती. त्यावेळी त्यांना बंडखोर आमदार जर शिवसेनेच्या संपर्कात असतील तर शिवसेनेची नावं त्यांनी जाहीर करावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.