मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून बंडखोरी नाट्य आता न्यायायलात गेले आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Rebel MLA Eknath Shinde) यांच्यावर गटनेते पदावरून कारवाई आणि 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका (Petition to the Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या याचिकेवर सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या राज्यासह देशातील राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आता आजच्या सुनावणीकडे लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून हरिष साळवे बाजू मांडणार आहेत तर देशातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी बंड करून मुंबई, सूरत आणि गुवाहाटी असा प्रवास केल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला.
या घटना घडत असतानाच आमदार चौधरी यांची शिवसेनेकडून गटनेतेपदी निवड करून मंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर तात्काळ बंडखोर आमदारांचे संख्याबळ दाखवून एकनाथ शिंदे गटांनी आमदार गोगावले यांची गटनेते पदी निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला. आमदारांच्या बंडखोरीवर निलंबनाची कारवाईप्रकरणीही दोन्हीकडून प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या.
शिवसेनेचे 16 बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर गटनेतेप्रकरणी झालेली कारवाईबद्दल एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्या विधानसभा उपाध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात ॲड.रवीशंकर जंध्याल बाजू मांडणार आहेत. याबाबत त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे.
कोणत्या मुद्यांवर प्रतिवाद करायचा या मु्द्द्यांबाबतही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली असून राजकीय पक्षाला व्हिप जारी करण्याचे अधिकार असल्याचं रवीशंकर जंध्याल यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदा आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.