ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही; आमच्या संयमाचा अंत पाहू नका; उदय सामंतांनी समर्थन करणाऱ्यांना दिला इशारा

| Updated on: Aug 03, 2022 | 3:21 PM

आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी त्या हल्ल्याचे समर्थन केले नसले तरी कट्टर शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत ते दिसतील तिथं गाडी फोडणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर हल्ला झाल्यावर पुण्यात हल्ला करणाऱ्यांवर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती

ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही; आमच्या संयमाचा अंत पाहू नका; उदय सामंतांनी समर्थन करणाऱ्यांना दिला इशारा
Follow us on

मुंबईः बंडखोरी नाट्यानंतर (Rebel MLA Plitics) राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत असताना, मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet)  झालेला नसतानाच आणि विरोधकांच्या चर्चेसाठी विषय सुरू असताना काल पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर बंडखोर आमदार उदय सामंत (Rebel MLA Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. हे प्रकरण चालू असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर असलेल्या सुनावणीवर आपण आता त्याबद्दल काही बोलणार नाही असं मत आमदार उदय सामंत यांनी आज व्यक्त केले. आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी न्यायालयातील याचिकेवरील सुनावणीवर त्यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याविषयी आपण बोलणे उचित होणार नाही आणि याविषयी न्यायालय योग्य तो निर्णय देईल आणि आम्हाला न्यायालयावर विश्वास असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

गाडी सिग्नलवर थांबली असतानाच आपल्यावर हल्ला

आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी त्या हल्ल्याचे समर्थन केले नसले तरी कट्टर शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत ते दिसतील तिथं गाडी फोडणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर हल्ला झाल्यावर पुण्यात हल्ला करणाऱ्यांवर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुण्याच्या अतिरिक्त पोलीस प्रमुखांबरोबर बोलणं झालं असून आपली गाडी सिग्नलवर थांबली असतानाच आपल्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.

हल्लेखोरांच्या हातात चाबूक

यावेळी त्यांनी सांगितले की, पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना ज्या व्हिडीओ क्लिप सापडल्या आहेत, त्यामध्ये हल्लेखोरांच्या हातात चाबूक आणि इतर साहित्य असल्याचे दिसत आहे, त्यामुळे सभेच असे साहित्य का घेऊन आले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची सभा होती. त्यानंतर काही वेळातच उदय सामंत यांच्यावर गाडीवर हल्ला झाल्याने उदय सामंत यांनी नेत्यानी आक्रमक भाषण केल्याने असे रिअॅक्शन होणं साहजिक होतं असं वक्तव्य त्यांच नवा न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

कोणाचीही राजकीय कारकीर्द संपू नये

माध्यमांनी याविषयी सवाल उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितले की, कोण कोणत्या मार्गाने गेला यापेक्षा कोणी हल्ला केला याला महत्व आहे. त्याबरोबरच या हल्ल्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कोणाचीही राजकीय कारकीर्द संपू नये असं सांगत असताना उदय सामंत यांनी आमचा कोणीही अंत बघू नये, आम्हीही परशुरामाच्या भूमीतून आलो आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

शिव्या घालणे ही परंपरा नाही

सध्या शिवसेना आणि बंडखोर आमदारांविषयी भावना तीव्र असतानाच उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याची कालपासून जोरदार चर्चा सुरु आहे. या हल्ल्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हल्ला झाल्यापासून मी काही चॅनलवर प्रतिक्रिया बघितल्या आहेत, त्यामध्ये शिव्या घातल्या जात आहेत. शिव्या घालणे ही काही महाराष्ट्रातील राजकीय परंरपरा आहे का सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका

या हल्ल्यानंतर पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर ते म्हणाले की, ज्यांना हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते त्यांना सोडवायला जाणार आहे का ? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. राजकीय माणुसकी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे ती काल पुण्यात सर्वांनी पुन्हा बघितली आहे. त्यामुळे राज्यातील सध्या राजकीय वातावरणामुळे 50 आमदारांचे गाल वरती आले का असा सवाल करुन आमचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे असंही त्यांनी यावेळी सांगितेल. त्यामुळे आमच्या संयमाचा अंत पाहू नका, आणि या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सांगत त्यांनी आपला पोलिसांवर विश्वास असल्याचेही त्यानी यावेळी सांगितल. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी बोलताना ते म्हणाले याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील मंत्री मंडळ विस्ताराच्या तारखा सांगण्या एवढा मी मोठा नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.