मुंबई : देशाच्या बहुतांश भागात असलेली उष्णतेची लाट आता मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागासह मुंबई शहर व उपनगरात उकाडा चांगलाच वाढला आहे. आज दिवसभरात पाऱ्याने विक्रमी उसळी घेतली. कुलाब्यात पाऱ्याने 35.4 अंशांची पातळी गाठली. याचवेळी सांताक्रुझमध्ये कमाल तापमानाने विक्रमी कहर केला. या ठिकाणी 38.1 अंश अशी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. कोकणातही होळीआधीच उष्णता प्रचंड वाढली आहे. होळीच्या तोंडावरच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Record break hit in Mumbai; temperature beyond 38 degrees, heat wave in Konkan for next two days)
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर असलेले चक्रीय क्षेत्र आता विदर्भ आणि छत्तीसगड लगतच्या परिसरावर आहे. मुंबई शहर व उपनगरात चालू महिन्याच्या सुरुवातीला तापमानाने विक्रमी 38 अंशांची पातळी गाठली होती. तसेच 13 मार्चला 38.2 अंशांची नोंद झाली होती. त्यानंतर पारा आज पुन्हा सक्रीय झाला आहे. कमाल तापमानाने मुंबईकरांना घामाघूम केले आहे. काही दिवसांमध्ये तापमानात याचप्रकारे वाढ नोंदविण्यात येईल आणि उकाडाही कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वर चढू लागल्याने नागरीक पुरते हैराण झाले आहेत.
मुंबईकरांना मार्च महिन्यातच मे सारख्या कडक उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील पाराही वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. याचवेळी अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तरेकडील राज्य आणि हिमालयाच्या विभागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 3 ते 7 अंशांनी वाढ झाली आहे. परिणामी राज्यातही दिवसाच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कोकणात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. आज रत्नागिरीमध्ये 39 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
समुद्राकडील थंडे वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहीत होताना अडथळा येत आहे. त्यामुळे मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील तापमान वाढले आहे. तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात सध्या हजेरी लावत असलेला अवकाळी पाऊस पुढील काही दिवस मुक्कामी असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने ट्विटर हॅण्डलद्वारे वर्तवला आहे. (Record break hit in Mumbai; temperature beyond 38 degrees, heat wave in Konkan for next two days)
Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल https://t.co/MnybIYq4Ev @ArjunKapoor_FC @MalaikaAroraFC_ #MalaikaArora #fitness #yoga
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
इतर बातम्या
अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल….
Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…