मुंबई : आपल्या स्वप्नाचं, आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी अनेकजण आयुष्याची सर्व जमा पुंजी खर्च करतात आणि कालांतराने आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. काही बिल्डकरांकडून एकच घर अनेकांना विकल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. त्यात आपली फसवणूक झाल्याचं ओरडून सांगितलं तरी त्याचा फायदा होत नसे. पण आता ही फसवणूक टळणार आहे. कारण RERA कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. (Fraud from builders to be avoided, changes in RERA Act)
जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. यापूर्वी फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात एक बिल्डर एकच प्लॅट अनेकांना विकतो. कालांतराने तो फ्लॅट विकत घेणाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं कळतं. तो अनेक ठिकाणी दाद मागायला जातो. असे अनेल लोक आमच्याकडेही येतात. पण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती. पण आता RERA कायद्यात बदल करण्यात आलाय. त्यामुळे एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचं आव्हाड म्हणाले.
सांगितल्याप्रमाणे RERA कायद्यात बदल केला असून यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाही. कायद्यातच बदल केल्याने कायद्याच्या चौकटीत आता विकासकांना राहावेच लागेल. RERA चे Controlling Authority श्री. अजोय मेहता यांचे आभार! pic.twitter.com/zxpS2Apamj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
एखादा प्लॅट विकल्यानंतर आता त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला RERA कायद्यानुसार ऑनलाईन करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा प्लॅट कुणाला विकला गेलाय याची माहिती उपलब्ध असेल. कायद्यातील या बदलामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. अशा प्रकरणाची फसणवूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक आता टळणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
Gold Silver Rate Today | रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा दर
Fraud from builders to be avoided, changes in RERA Act