माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

| Updated on: May 18, 2021 | 10:33 PM

बोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी ही तक्रार केली आहे.

माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार
राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल
Follow us on

मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी ही तक्रार केली आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून, ते सीआयएसएफचे पोलीस महासंचालक आहेत. सध्या सीबीआयचे महासंचालक पद रिक्त आहे. या पदावर त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची निवड प्रक्रियेद्वारे निवड केली जाणार आहे. (complaint against former director general of police Subodh Kumar Jaiswal)

सीबीआयच्या महासंचालकपदाची निवड एका समितीमार्फत केली जाणार आहे. या समितीचे प्रमुख पंतप्रधान असतात. सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीसाठी या समितीची लवकरच एक बैठक होणार आहे. त्यावेळी सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे जयस्वाल यांच्या नियुक्तीबाबत विचार केला जाऊ नये, असं या तक्रारीत म्हटलंय. जयस्वाल यांच्या विरोधात मोक्का कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. जयस्वाल हे या स्पर्धेत राहू शकत नाहीत, असं राजेंद्र त्रिवेदी यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

सुबोधकुमार जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्रात

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर असताना सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. सीआयएसएफच्या महासंचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. भारतीय पोलीस सेवेतील 1985 च्या बॅचचे अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल हे पूर्वी रॉ मध्ये दिल्लीत होते. मात्र, दत्ता पडसलगीकर यांचा पोलीस आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारने सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यातच 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार बनवले. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीतून जयस्वाल यांना केंद्रीय यंत्रणेवर प्रतिनियुक्तीबाबत हिरवा कंदील मिळाला होता. मात्र, जयस्वाल यांनी त्यावेळी नकार दिला होता.

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.

RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली

सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता

सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.

मुंबई पोलीस दलात त्यांनी पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कारभारही त्यांनी पाहिला आहे.

सध्या ते प्रतिनियुक्तीवर केंद्रात सीआयएसएफच्या महासंचालकपदी आहेत.

संबंधित बातम्या :

Subodh Kumar Jaiswal : सुबोध जैस्वालांची CISF महासंचालकपदी बदली, महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी?

परमबीर सिंग यांनीच पत्र लिहिले असं नाही तर सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडूनही खळबळजनक अहवाल, शासनाने तो लपवला : फडणवीस

complaint against former director general of police Subodh Kumar Jaiswal