मुंबई : आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार काल (शुक्रवार) समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे. (Retired Navy Officer attack Case Shivsena Official among arrested)
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. काल (शुक्रवार) दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राजकीय पुढार्यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.
Shiv Sena’s Kamlesh Kadam and five others, arrested in connection with the attack on a retired Navy officer, granted bail by Samta Nagar Police Station. #Mumbai https://t.co/vK9mC7lnyb
— ANI (@ANI) September 12, 2020
“आपले वडील मदन शर्मा यांनी व्यगंचित्र फॉरवर्ड केल्यानंतर त्यांना अनेक फोन येत होते. त्यानंतर बिल्डींगबाहेर बोलावून त्यांना मारहाण करण्यात आली” असा दावा त्यांची कन्या डॉ शीला शर्मा यांनी केला आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यात काही जण मदन शर्मा यांच्या मागे धावताना दिसत आहेत.
मारहाण प्रकरणी आरोपी कोण?
1) कमलेश चंद्रकांत कदम, वय 39 वर्षे
2) संजय शांताराम मांजरे, वय 52 वर्षे
3) राकेश राजाराम बेळणेकर, वय 31 वर्षे
4) प्रताप मोतीरामजी सुंदवेरा, वय 45 वर्षे
5) सुनिल विष्णू देसाई, वय 42 वर्षे
6) राकेश कृष्णा मुळीक, वय 35 वर्षे
(Retired Navy Officer attack Case Shivsena Official among arrested)
अभिनेत्री कंगना रनौत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
कंगनाची व्हिडीओच्या माध्यमातून टीका
#SenaAttacksVeteran #Udhavresignnow #CantBlockRepublic pic.twitter.com/a7y0bs6vqr
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020