मुंबई : व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला आहे. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. मूळ पक्ष कुणाचा याची आधी खात्री पटवावी लागेल, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्टपणे सांगितलं आहे. नेमका तो पक्ष कोणाचा तो, कोणाला रिप्रेझेंट करतो. याची खात्री पटवून घ्यावी लागेल. कोणी व्हीप काढावा, यावर निर्णय घेणे अवघड आहे. त्यामुळे सर्वप्रमुख मूळ राजकीय पक्ष कोण, यावर विचार करावा लागेल.
राहुल नार्वेकर म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांना परत एकदा नोटीस पाठवले आहेत. सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यांना पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत अभिप्राय कळवायचा आहे.
जयंत पाटील यांनी यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे. माझ्याकडे जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची स्कृटणी सध्या सुरू आहे. त्याची खात्री पटल्यानंतर पुढची कारवाई करू, असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं.
शिवसेनेचे दोन गट झालेत. ठाकरे गटापासून शिंदे गट वेगळा झाला. त्यामुळे शिवसेना कुणाची यावर वाद निर्माण झाला होता. पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाले. आता कोणाचा व्हीप लागू होणार, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ठाकरे गटाचा व्हीप लागू झाल्यास शिंदे गटातील आमदार अपात्र ठरू शकतात. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे. सात दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, असे नोटिसीत म्हटले आहे.