ठाण्यात रिंग मेट्रो धावणार, 22 स्थानकांची योजना, लवकरच डीपीआर तयार होणार

| Updated on: Aug 12, 2024 | 8:11 PM

ठाणे रेल्वे स्थानकाशेजारील वाढती गर्दी आणि ट्रॅफीक जामच्या समस्येतून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी ठाण्यात आता रिंग मेट्रोचा प्रकल्प राबविण्याची योजना आहे.

ठाण्यात रिंग मेट्रो धावणार, 22 स्थानकांची योजना, लवकरच डीपीआर तयार होणार
Metro file photos
Follow us on

ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाची अमलबजावणी करण्याची योजना एमएमआरसीएलने आखली आहे. ही रिंग मेट्रोमुळे कनेक्टीव्हीटी वाढणार असून सध्या मेट्रोचा फिडर रुट म्हणून तिचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला आहे.

ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातल्या ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे. तसेच येऊ घातलेल्या ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फिडर रुट म्हणून उपयोगी पडणार आहे. 29 किमी लांबीच्या या प्रकल्पात एकूण 22 स्थानकांची योजना असून त्याच्या संदर्भात डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे टेंडर लवकरच काढले जाणार आहे.

या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते घोडबंदर आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे. तसेच मध्य रेल्वेचे ठाणे रेल्वेस्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होणार आहे. तसेच येऊ घातलेल्या मेट्रो – 4 ( वडाळा ते कासारवडवली ) आणि मेट्रो- 5 ( ठाणे ते भिवंडी ) या मेट्रोमार्गिकेसाठी फिडर रुट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होणार आहे.

या मेट्रोचा वेग सरासरी दरताशी 35 किमी असणार आहे. तर सुरवातील दर पंधरा मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची 1500 प्रवाशांची क्षमता असणार आहे. संपूर्ण लूप ( वर्तुळ )   पूर्ण होण्यासाठी एक तासांचा अवधी लागणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12000 कोटी रुपये असणार आहे. कासारवडवली येथे या मेट्रोचे कारशेड उभारण्याची योजना आहे.

एकूण 22 स्थानके

या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून 20 स्थानके उन्नत स्वरुपाची तर 2 स्थानके अंडरग्राऊंड असणार आहेत. स्थानकांची नावे पुढीलप्रमाणे – जुने ठाणे, नवीन ठाणे, रायलादेवी,वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्य नगर बस स्टेशन, पोखरण-1, उपवन, गांधीनगर, काशीनाथ घाणेकर ऑडीटोरिएम, मानपाडा, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, हिरानंदानी इस्टे़ट, ब्रह्मांड, आझादनगर बस स्टॉप, मनोरमा नगर, कोलशेत,बाळकुम नाका, साकेत, शिवाजी चौक