मुंबईः अंधेरी पोटनिवडणुकीकडे (Andheri by-election) आता दोन्ही गटातील शिवसेनेस राज्यातील इतर राजकीय पक्षांचेही लक्ष लागून राहिले आहे. या घडामोडींना चालू असतानाच राजीनाम्यामध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळे राजीनामा मंजूर होण्याची प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja latake) यांनी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन माझा राजीनामात तात्काळ मंजूर करण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टीव्ही नाईनशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट करतानाह हेही सांगितले की, आपल्याला कुणाचा दबाब आणि शिंदे गटाची कोणतीही ऑफर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे त्यांनी आपली निष्ठा ही शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगत आगामी पोटनिवडणूक ही मशाल चिन्हावरच लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेची काय रणनिती ठरणार हे आता पाहावे लागणार आहे.
ऋतुजा लटके यांच्या बीएमसी सेवेचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी आज आयुक्तांची भेट घेण्यासाठी बीएमसीमध्ये दाखल झाल्या होत्या.
त्यावेळी आपल्या उमेदवारी आणि शिंदे गटाच्या मंत्री पदाच्या ऑफरविषयी बोलताना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेबरोबरची आपली निष्ठा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाल्या झाल्या अंधेरी पोटनिवडणुकीतील राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार आहे.
आयुक्तांना भेट घेतल्यानंतर राजीनाम्याममध्ये राहिलेल्या त्रुटींबाबच चर्चा करुन राजीनाम तात्काळ मंजूर करण्याची विनंती करणार आहेत.
राजीनाम मंजूर करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त सहीसाठी राजीनामा थांबवण्यात आल्याचेही बीएमसी कार्यालयाकडून त्यांना सांगण्यात आले आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके लढणार असल्याने महानगरपालिकेच्या सेवेतून लवकर मुक्त झाल्याशिवाय त्यांना ही निवडणूक लढविता येणार नसल्याने त्यांच्याकडूनही घाई केली जात आहे.