मुंबई : नेहमी मुंबईच्या खड्ड्यांवरुन आणि मुंबईतील समस्यांवर हटके अंदाजात गाणं बनवणारी आरजे मलिष्का (RJ Malishka) यंदा पुन्हा एकदा नव्या अंदाजात समोर आली आहे. ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही का…’ या गाण्यातून मलिष्काने मुंबईच्या समस्या प्रशासना समोर मांडल्या होत्या. यंदाही आरजे मलिष्काने (RJ Malishka) अशाच हटके अंदाजात आणखी एक गाण सर्वांसमोर घेऊन आली आहे. यामध्ये तिने मुंबईतील खड्डे (Pothole) आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला आहे. या गाण्याचा व्हिडीओ तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये मलिष्का नवरीच्या वेशभूषेत दिसत आहे. या गाण्याची सुरुवात तिच्या नेहमीच्या शैलीत मुंबई…. असं म्हणताना आहे. तसेच गाण्यात चंद्राची उपमा देत मुंबईतील खड्डे दाखवलेले आहेत. विशेष म्हणजे देखो चाँद आया, तुम आए तो आया मुझे याद गली मे आज चाँद निकला…..पासूनते अनेक हिंदी गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे मराठी गाणं ‘डोंगराचे आरुन इक बाई चांद उगवला’ गाण्याचाही यामध्ये समावेश आहे.
थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, चंद्रावर जसे खड्डे आहेत, तसेच खड्डे आता मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीत दिसत आहे. यावरुनच चंद्राची उपमा देत मलिष्काने या गाण्यातून मुंबईतील खड्ड्यांवर निशाणा साधला आहे.
खड्ड्यांमुळे मुंबईकरांना करावा लागणारा नाहक त्रास या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे. हा व्हिडीओ मलिष्काने फेसबुकवर पोस्ट केला असून सध्या मोठ्या प्रमाणात या व्हिडीओला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेक कॉमेंट व्हिडीओवर येत आहेत.
मुंबईची तुलना चंद्रासोबत करत मलिष्काने #moon #tothemoon #MumbaiKiRani #potholes अशा टॅगचा वापर केला आहे. दोन वर्षापूर्वी जेव्हा मलिष्काने मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही का गाणं लाँच केलं होते. तेव्हा पालिका आणि मलिष्का यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र या नव्या गाण्यावरुन प्रशासन दखल घेणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मलिष्काच्या नव्या व्हिडीओमध्ये चंद्रावरुन वापरण्यात आलेली सात गाणी