RTO कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलनाची हाक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्या अर्थात 1 फेब्रुवारीला लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या लेखणी बंद आंदोलनात परिवहन आयुक्त कार्यालयासह राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी सहभागी होणार आहेत. आपल्या मागण्यांबाबत अनेक वेळा सरकारकडे निवेदनं दिली,मात्र कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, […]

RTO कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलनाची हाक
Follow us on

मुंबई: मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्या अर्थात 1 फेब्रुवारीला लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या लेखणी बंद आंदोलनात परिवहन आयुक्त कार्यालयासह राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी सहभागी होणार आहेत.

आपल्या मागण्यांबाबत अनेक वेळा सरकारकडे निवेदनं दिली,मात्र कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागत असल्याची माहिती, RTP कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील आणि सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली. दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकतील आणि असंतोष व्यक्त करतील, असा निर्णय कार्यकारिणीने 20 जानेवारी रोजी घेतला होता, त्यानुसार उद्या 1 फेब्रुवारीला लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

RTO संघटनेने 3 जानेवारी 2019 रोजी राज्य स्तरावर ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र या आंदोलनाची दखल न घेतल्याने, संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.