मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांनी त्यांचा कोणी तरी गाडीमधून पाठलाग करत असल्याचं म्हटलं. सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केलाय. गाडीमध्ये पोलिसांचा बोर्ड लावून गाडीचा पाठलाग होतोय, असं वाझे म्हणाले. वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी एटीएसची असल्याची सूत्रांची माहिती आहे. सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थोड्या वेळानं स्टेटमेंट जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. (Sachin Vaze claimed unknown vehicle follow him Mansukh Hiren death case latest news)
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दावा केल्याप्रमाणे MH 45 7W 4887 ही गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग करतेय. मात्र, या गाडीचा नंबर हा बोगस असल्याचं एपीआय सचिन वाझे यांनी म्हटलंय. या गाडीच्या बाजूला पोलीस लिहिलेला बोर्डही पाहायला मिळाला. शिवाय पुढच्या नंबरप्लेटवर MH ZW 4887 असा नंबर दिसतोय तर मागच्या नंबर प्लेटवर MH 7W 4887 असा नंबर दिसतोय. त्यामुळे या नंबरप्लेटशी छेडछाड केल्याचेही स्पष्ट होतंय. गाडीच्या आत काही नंबरप्लेट दिसून येतायत ज्या खऱ्या आहेत की बनावट हे अद्याप तरी स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, ही गाडी नक्की कोणाची आहे आणि सचिन वाझे यांचा पाठलाग कोण आणि का करतय? असा सवाल आता निर्माण होत आहे.
मुंबई पोलिसांनी सचिन वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी ताब्यत घेतली आहे. आता सचिन वाझे यांचा पाठलाग करणाऱ्या गाडीची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून संबंधित गाडीच्या चारी बाजूनं बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. गाडीच्या आतमध्ये नंबर प्लेट आढळल्यानं ती गाडी नेमकी कुणाची हा प्रश्न निर्माण झालाय.
सचिन वाझे आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीला गेले आहेत. त्यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्याशी दोन तास चर्चा केल्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे अखेर पोलीस मुख्यालयातून बाहेर आले होते.
संबंधित बातम्या:
Sachin Vaze News Live | शरद पवार मुंबईत दाखल, वाझेप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार?
अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड
Sachin Vaze claimed unknown vehicle follow him Mansukh Hiren death case latest news