मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) सुरू असलेले पावसाळी अधिवेशन पहिल्याच दिवसांपासून वादळी ठरले आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांकडून विधान सभेच्या (Vidhan sabha) पायऱ्यांवर बसून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री (Matoshri) ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात असून त्यांच्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
सचिन वाझे प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते, त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांनी वाझे प्रकरणावरून ठाकरे घरण्याला निशाणा करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी झालेले घोटोळ्यांवर सत्ताधाऱ्यांनी टीका करत मातोश्रीवर टीका करण्यात आली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना सचिन वाझेंचे प्रकरण घडल्यामुळे ठाकरे घराणे, मातोश्री आणि आदित्य ठाकरेंवर जोरदापण टीका करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचा असलेला रोष दिसून आला.
काल विधान सभेत घोषणाबाजी करत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्याप्रमाणे आजही अधिवेशना जोरदार हंगामा होणार असल्याचे दिसून येत होते, मात्र घोषणाबाजी आणि जोरदार टीका करण्यात आली .
विरोधकांकडून काल जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर 50 खोक्यांचे प्रकरण एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागल्यानेच सत्ताधाऱ्यांकडून आज जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे घराण्यावर निशाणा साधण्यात आला.