मुंबईः शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या (Shivsena Rebel MLA) लढ्याला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) पदावर विराजमान करून या लढ्याला यश आल्याचे दिसत आहे. आजा साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथविधी होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपमध्येही आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यांच्या या निवडीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद व्यक्त केला.
त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केलेच मात्र यावेळी या महत्वाच्या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी सदाभाऊ खाते (Sadabhau Khot) यांनी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सार्थ अभिमान असून देवेंद्र फडणवीस म्हणजे, मोठ्या मनाचं नेतृत्व, हिमालयाच्या नेतृत्वाच्या उंचीचं नेतृत्व मला देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिसते असंही त्यांनी त्यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, आम्ही देवेंद्र यांच्यासोबतच आहोत आणि मला त्यांचा सार्थ अभिमान आहे, मी एका अशा महान नेत्यासोबत काम करत आहे असल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना, त्यांनी सांगितले की, एका सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा आहे, आणि स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचा विकासाला एक गती मिळणार असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे स्वागत बंडखोर शिवसेनेच्या आमदारांसह आनंद व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले जात आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व आहे. त्यांचे नवा संकल्प त्यांनी जाहीर केले आहेतच त्यामुळे राज्य नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील एक प्रगल्भ नेतृत्व, मोठ्या मनाचं नेतृत्व आणि हिमालयाच्या उंचीचं नेतृत्व म्हणजे आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिसते असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळीत्यांना उपमुख्यमंत्री पदाविषयी विचारले असता त्यांनी सांगितल की, हा निर्णय पक्ष घेईल असं मत त्यांनी व्यक्त केले.