बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते. जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याचे दिसून येते. त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळाला आहे. पोलिसांनी याविषयीचे सीसीटीव्हीतील फुटेजमधील आरोपीचा फोटो शेअर केला आहे.
पोलिसांच्या 15 टीमकडून तपास
सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले होते. दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत आहे.
…आणि सीसीटीव्हीमध्ये तो सापडला
आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला. घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला. त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना 6 व्या मजल्यावर दिसला. या फोटोवर 2 वाजून 33 मिनिटांची वेळ दिसत आहे.
सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता
पोलिस सूत्रांच्या माहिती प्रमाणे, ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत.
पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात.
आरोपी प्रभादेवी परिसरात लपला
आरोपी प्रभादेवी परिसरात लपला. पोलिसांना लोकेशन सापडलं. पोलीस तपास घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याचे समजते.