मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus) 35 वी अटक झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सर्वात मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithni) याला बेड्या ठोकल्या. एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Sameer Wankhede praised on social media in Siddharth Pithani arrest in Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus)
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही.
यामुळे एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.
1 जूनपर्यंत एनसीबी कोठडी
सिद्धार्थ पिठाणी हैद्राबाद येथे लपला होता. त्याला शोधून एनसीबीचे अधीक्षक किरण बाबू यांनी अटक केली. पिठाणी याला आज पाच दिवसांची म्हणजेच 1 जूनपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. पिठाणी याच्यावर NDPS कायद्याच्या कलम 28, 29, 27 (a) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सिद्धार्थच्या घरात काय काय सापडलं?
सिद्धार्थच्या घरात आक्षेपार्ह कागदपत्रं सापडली आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या घरात सापडलेला इलेक्ट्रॉनिक पुरावा अधीक्षक किरण बाबू यांनी जप्त केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ही 35 वी अटक आहे. सिद्धार्थ हा सुशांतच्या ड्रीम टीममध्ये होता. तो सुशांतला अंमली पदार्थ देत असल्याचा आरोप आहे.
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली.
सोशल मीडियावर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव
Pithani Arrested By NCB
Thank You @narcoticsbureau , @dg_ncb #SameerWankhede Sir , Salute To You And Your Team ??We Faith On Our National Agency. ??#WellDoneNCB ????
TRUSTING CBI CHIEF 4 SSR CASE pic.twitter.com/DYm7AGo3H2
— Seemu.. (SSRians?) ? Har Har Mahadev ??? (@seemuy_93) May 28, 2021
Thank u for this news suhail Siddharth pithani finally arrested by @narcoticsbureau kudos to #Sameerwankhede sir and team. All those who were saying what are the agencies doing – pls do not loose hope- Agencies are at work. – TRUSTING CBI CHIEF 4 SSR CASE https://t.co/a8mys8UPoU
— Smita GLK Parikh – SSR???? (@smitaparikh2) May 28, 2021
One strong step towards justice??#SameerWankhede Sir, hats off to you!!!
Our faith has grown stronger in you & the agencies!!Justice will happen, we will win?
TRUSTING CBI CHIEF 4 SSR CASE— ??????✨ (@aurora_ssr) May 28, 2021
सुशांतची आत्महत्या
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने केलेल्या सिद्धार्थ पिठाणीच्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक
सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!
(Sameer Wankhede praised on social media in Siddharth Pithani arrest in Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus)